मुंबई, दि. 29 : माहिती व जनसंपर्क
महासंचालनालयाच्यावतीने सप्टेंबर महिन्यात राज्यभर ‘लोकराज्य वाचक अभियान’ राबवण्यात येत आहे.
या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ व स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी
मार्गदर्शन शिबिर दि. १ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० वाजता युनिक अकॅडमी, दादर येथे आयोजित करण्यात आले
आहे. यावेळी आयएएस अधिकारी अजित कुंभार हे उद्घाटक व वक्ते म्हणून उपस्थित राहणार
आहेत.
श्री. कुंभार हे पालघर येथे सहायक जिल्हाधिकारी
म्हणून कार्यरत आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी, अभ्यासाचे नियोजन, मुलाखत, सातत्य, परिश्रम याबाबत
मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची ते उत्तरे देतील.
‘लोकराज्य’ हे महाराष्ट्र
शासनाचे मुखपत्र असून शासनाचे निर्णय, योजना, यासह उपयुक्त माहिती या मासिकातून दिली जाते. हे मासिक
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी अतिशय उपयुक्त आहे. अधिकाधिक नागरिक व
विद्यार्थ्यांपर्यंत लोकराज्य जावा, यासाठी सप्टेंबर महिन्यात ‘लोकराज्य वाचक अभियान’ राबविण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत लोकराज्य वाचकांचे मेळावे, स्पर्धा परीक्षा
देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर, शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा
आदी कार्यक्रम राज्यभर घेण्यात येणार आहेत.
००००
No comments:
Post a Comment