Monday, 1 October 2018

महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीदिनानिमित्त खादी व ग्रामोद्योग वस्तुंचे मंत्रालयात प्रदर्शन


मुंबई, दि.1 :महात्मा गांधी  यांच्या 150व्या जयंती दिनानिमित्त खादी व ग्रामोद्योग वस्तुंचे मंत्रालयात प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन बुधवार दि. 3ते  शनिवार दि. 6 ऑक्टोबर या दरम्यान मंत्रालयातील मुख्य इमारतीच्या आवारातील त्रिमुर्ती प्रांगणात भरवण्यात येणार आहे.
 ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या ग्रामोद्योगी वस्तूंच्या या  प्रदर्शनात  खादी वस्त्र, लाकडी वस्तू, मध, व इतर हस्तकला व गृहपयोगी वस्तु बघायला मिळणार आहेत. या प्रदर्शनास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई हे बुधवारी सकाळी 10.30 वाजता भेट देणार आहेत.   यावेळी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती विशाल चोरडीया, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.म. निलीमा केरकेट्टा व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
ग्रामीण भागातील कारागिरांनी उत्पादित केलेल्या खादी वस्र व ग्रामोद्योगी उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याच्या हेतूने महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत विविध उपक्रम राबविले जातात.
००००

No comments:

Post a Comment