Tuesday, 2 October 2018

समाज कल्याण विभागात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन

 नागपूर दि. 2 : राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना त्यांच्या जयंतीनिमित्त समाज कल्याण विभागात अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या प्रतिमेस प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त कार्यालयातील सहायक संचालक श्री. कुमरे, समाज कल्याण अधिकारी श्रीमती सुकेशिनी तेलगोटे, लेखाधिकारी श्री. बोंडे, सहायक लेखाधिकारी श्री. सहारकर  तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 
                                                                             *****

No comments:

Post a Comment