Wednesday, 2 January 2019

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत जनजागृती मोहीम व प्रात्याक्षिक आजपासून

      नागपूर दि. 02, मुख्य निवडणूक अधिकारी  यांच्या आदेशानुसार राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - 2019 साठी नागपूर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघात उद्या गुरुवार दि03 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत जनजागृती मोहिमेला सुरुवात होत आहे.
          ही जनजाग्रती मोहीम जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातून सुरु होणार आहे.  ही  जनजागृती मोहीम विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रनिहाय राबविण्यात येणार असून, त्याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे.  तसेच व्हीव्हीपॅटबाबतचे प्रात्यक्षिक करण्यात येणार आहे. यावेळी मतदारांच्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅटबाबत विचारलेल्या सर्व शंकाचे निरसन करण्यात येईल. याकामी नागपूर जिल्ह्यात एकूण 25 प्रशिक्षित पथके तयार करण्यात आली असून, प्रत्येक विधानसभा संघनिहाय दोन पथके नेमण्यात आली आहेत. नागपूर जिल्ह्यातील सर्व मतदार, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी व सर्वसामान्य नागरिकांनी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती मोहिमेदरम्यान सर्व शंकांचे निरसन करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.
****  

No comments:

Post a Comment