मुंबई, दि. 2 : नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना तांत्रिक मार्गदर्शन, नागरी व्यवस्थापन, आर्थिक सल्ला, घनकचरा व स्वच्छता व्यवस्थापनामध्ये कार्यरत असलेल्या तंज्ज्ञांकडून
कार्यशाळेत योग्य ते मार्गदर्शन करुन स्वच्छ भारत अभियानाचे (शहरी) उद्दिष्ट साध्य
करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले असल्याचे प्रतिपादन राज्याचे माहिती आयुक्त ए.
के. जैन यांनी केले.
स्वच्छ भारत अभियान (शहरी) अंतर्गत एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन सह्याद्री
अतिथीगृह येथे केले आहे. कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी श्री.जैन बोलत होते.
यावेळी नीरीचे संचालक डॉ. राकेश कुमार, राज्य वित्त आयोगाचे व्ही. गिरीराज,
आयआरएडीईच्या संचालक डॉ. ज्योती पारेख, आयएलएफएसच्या
संचालक श्रीमती मालिनी शंकर, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे
आयुक्त ई.रविंद्रन, एन्व्हायरमेंटल रिसर्च फाऊंडेशनच्या
महाव्यवस्थापक पौर्णिमा गुप्ता व राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका,
नगरपंचायत यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी श्री.जैन म्हणाले, स्वच्छ भारत अभियानांतर्गत विचाराचे व अनुभवाचे
आदान प्रदान करण्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन एन्व्हायरमेंटल रिसर्च फाऊंडेशन,
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, निती आयोग,
स्वच्छ महाराष्ट्र मिशन व सीएसआयआर (नीरी) यांच्या संयुक्त
विद्यमाने नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आयोजित केली आहे. या कार्यशाळेमुळे
नागरी स्थानिक स्वराज्य संस्था यांना स्वच्छ भारत अभियानाचे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी
मदत होणार आहे.
या कार्यशाळेमध्ये सन 2017-18 मध्ये ‘स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार’ ज्या
स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळाले आहे व तांत्रिक प्रदाते ज्यांनी राष्ट्रीय व
राज्यस्तरावर भूमिका बजावल्या अशांना त्यांच्या अनुभवाची देवाण घेवाण करण्याकरीता
आमंत्रित केले आहे. इंदौर,
नाशिक व पुणे येथील घनकचरा व्यवस्थापनामधील नाविण्यपूर्ण यशोगाथा व
सिन्नर-नाशिक, बंगलोर व गुजरातमधील स्वच्छता व्यवस्थापनामधील
तज्ज्ञ यांच्या अनुभवाचे सादरीकरण करणार आहे.
सीएसआयआर-नीरी व एन्व्हायरमेंटल
रिसर्च फाऊंडेशन यांच्या सामंजस्य करार
स्वच्छता भारत मिशन अंतर्गत (शहरी) नागरी व्यवस्थापन, आर्थिक सल्ला
व घनकचरा व स्वच्छता व्यवस्थापनाबाबतच्या माहितीच्या आदान-प्रदानासाठी
सीएसआयआर-नीरी व एन्व्हायरमेंटल रिसर्च फाऊंडेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात
आला. या सामंजस्य करारावर सीएसआयआर-नीरीचे संचालक राकेश कुमार व एन्व्हायरमेंटल रिसर्च
फाऊंडेशनच्या महाव्यवस्थापक पौर्णिका गुप्ता यांनी स्वाक्षरी केली.
000


No comments:
Post a Comment