Saturday, 2 February 2019

'दिलखुलास' मध्ये अॅड. उमेशचंद्र यादव यांची मुलाखत



मुंबई,दि. 2 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलासकार्यक्रमात सहकार विषयाचे अभ्यासक अॅड. उमेशचंद्र यादव यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून सोमवार दि. ४ आणि मंगळवार दि. ५ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. निवेदक प्रसाद मोकाशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.
           सहकार कायद्यामध्ये अलीकडे काही बदल झाले आहेत.  ते बदल नेमके काय आहेत, त्याचा सहकारी संस्था विशेषतः गृहनिर्माण संस्थांवर होणारा परिणाम, कायद्यातील बदलामुळे  समस्यांचा निपटारा होण्यासाठी शासनाने उचललेली पावले, सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये झालेला बदल, सहकारी गृहनिर्माण संस्थांचे अभिहस्तांतरण, अभिहस्तांतरण करून घेण्यासाठीची प्रक्रिया, अभिहस्तांतरण  केल्यानंतरचे फायदे आणि न केल्यास तोटे, सहकारी गृहनिर्माण संस्थांचा पुनर्विकास आदी विषयांची माहिती श्री. यादव यांनी दिलखुलासकार्यक्रमातून दिली आहे.
0000

No comments:

Post a Comment