नागपूर, दि. 11 : शहरातील बाजीप्रभू नगर, पांढराबोडी
तसेच हिलटॉप येथील विविध प्रश्नासंदर्भात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या
उपस्थितीत आढावा घेण्यात आला. यावेळी महापौर नंदाताई जिचकार अतिरिक्त महापालिका
आयुक्त रविंद्र ठाकरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील तसेच नगरसेवक उपस्थित
होते.
बाजीप्रभू नगर येथील स्वच्छता
तसेच पांढराबोडी तलाव व बगिचांच्या दुरुस्तीसह या परिसरातील अनधिकृत दुकानांमुळे
येथील नागरिकांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घेण्याची सूचना पालकमंत्री
चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीत दिली. हिलटॉप येथे सीसीटीव्ही कॅमेरा लावणे,
परिसरातील स्वच्छता ठेवणे त्यासोबतच अवैध व्यवसायांविरुद्ध तात्काळ कारवाई करणे
यासंदर्भातही अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी निर्देश दिले.
कुंभारटोली, मरीयन नगर आदी
झोपडपट्टयातील नागरिकांना पट्टे वाटपाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या
अडचणी तात्काळ सोडविण्यात याव्यात, यासाठी महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास व
महसूल विभागाची संयुक्त बैठक उपजिल्हाधिकारी रविंद्र कुंभारे यांच्या उपस्थितीत
अशी सूचना यावेळी केली. ट्रॉफिक पार्कच्या संदर्भात महापौर यांनी बैठक आयोजित करुन
ट्रॉफिक पार्क सुरु करतांनाच सभोवताल राहणाऱ्या नागरिकांना अवैध पार्किंगचा त्रास
होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असेही बैठकीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
यांनी सांगितले. यावेळी ओसीडब्ल्यूतर्फे पिण्याच्या पाण्याचे दिल्या जाणाऱ्या
बिलाबाबतचा प्रश्न तसेच जनमंच या संस्थेतर्फे सुचविण्यात आलेल्या विविध प्रश्नासंदर्भातील
अधिकाऱ्यांनी सोडविण्यासंदर्भात कारवाई करावी, असेही बैठकीत पालकमंत्र्यांनी
सांगितले.
*****
No comments:
Post a Comment