नागपूर, दि. 4 : राज्यपाल चे. विद्यासागर
राव यांचा उद्या मंगळवार, दिनांक 5
फेब्रुवारी रोजीचा नागपूर व रामटेक दौरा कार्यक्रम पुढीप्रमाणे आहे :
मंगळवार, दिनांक 5 फेब्रुवारी रोजी मुंबई येथून सकाळी 9.20
वाजता नागपूर विमानतळावर आगमन व राखीव. सकाळी 9.25 वाजता महामहिम राज्यपाल नागपूर
विमानतळावरुन हेलिकॉप्टरने रामटेककडे रवाना होतील. सकाळी 9.45 वाजता हेलिपॅड,
किट्स कॉलेज ग्राऊंड, रामटेक येथे आगमन व राखीव व त्यानंतर राज्यपालांचे सकाळी
9.50 वाजता हेलिपॅड, किट्स कॉलेज ग्राऊंड, रामटेक येथून मोटारीने गोळवलकर गुरुजी
स्मारकाकडे प्रयाण होईल. सकाळी 10.00 वाजता गोळवलकर गुरुजी
स्मारक, रामटेक येथे आगमन व स्मारकास भेट देऊन कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ
येथे आगमन होईल.
सकाळी 10.30 ते 12.00 या दरम्यान कवि
कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ येथील गोळवलकर गुरुजी गुरुकुलम उद्घाटन
सोहळ्यास राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची उपस्थिती. दुपारी 12.10 वाजता हेलिपॅड, किट्स कॉलेज
ग्राऊंड, रामटेक येथे आगमन व तेथून 12.15
वाजता हेलिकॉप्टरने नागपूरकडे प्रयाण. दुपारी
12.35 वाजता नागपूर विमानतळावर आगमन व तेथूनच दुपारी 12.40 वाजता विशेष
विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.
****
No comments:
Post a Comment