Thursday, 7 February 2019

निवडणूक विभागाकडून व्ही. व्ही. पॅटचे प्रात्यक्षिक सादर







नागपूर, दि. 7 : जिल्हा परिषदेच्या अण्णासाहेब खेडकर सभागृहात निवडणूक विभागाच्या वतीने आज सदस्यांना व्हीव्हीपटचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. यावेळी व्यासपठावर जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती निशा सावरकरउपाध्यक्ष शरद डोणेकरसभापती दीपक गेडामउकेश चव्हाणश्रीमती पुष्पा वाघाडेअतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदारउप मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती प्रमिला  जाखलेकर यांची उपस्थिती होती.
यावेळी हिंगणा तहसीलदार प्रताप वाघमारे यांनी उपस्थित सदस्यांना व्हीव्हीपट मशिन आणि मतदान याबद्दल प्रात्यक्षिक सादर केले. तसेच उपस्थित जिल्हा परिषद सदस्यांनी मतदानाचे प्रात्यक्षिक केले. 
                                   ******

No comments:

Post a Comment