Wednesday, 11 December 2019

वन संवर्धनासाठी माजी सैनिकांची 10 जानेवारीपासून भरती

नागपूरदि.11: वृक्षारोपणवृक्षसंवर्धन यासाठी पात्र इच्छुक माजी सैनिकांसाठी 136 इन्फेंट्री बटालियन (भूदल) पर्यावरणमहारच्यावतीने जेसीओसोल्जर जी.डी आणि ट्रेडमन यांची भरती 10 ते 12 जानेवारीमध्ये होत आहे. महाराष्ट्रातील माजी सैनिकांसाठी जेसीओ आणि सोल्जर जी.डीभारतातील माजी सैनिकांसाठी ट्रेडमनची औरंगाबादमध्ये भरती होणार आहे.  याबाबत अधिक माहितीसाठी 97977075300959625125102402370195 या क्रमांकावर संपर्क साधावाअसे बटालियनच्यावतीने कळविण्यात आले आहे.
भरती प्रक्रियेनंतर जे.सी.ओ  सैनिकांचा बेस 136 इन्फेंट्री बटालियन (भूदल) पर्यावरणमहारचे मिलिट्री कॅम्प असेल. यासाठी सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर 5 वर्षाच्या आतील सर्व जवान आणि जे.सी.ओ. वन विभागातील सेवानिवृत्त महिला कर्मचारी अर्ज करण्यासाठी पात्र आहे.  माजी जे.सी.ओ 48 वर्षमाजी एन.सी.ओजवान 42 वर्षवन विभागातील सेवानिवृत्त महिला कर्मचाऱ्यांना वयाची मर्यादा नाही. अर्जदार शारीरिकदृष्ट्या शेप-1 आणि चरित्रदृष्ट्या उत्कृष्ट वा फार चांगला असणे आवश्यक आहे. सेवानिवृत्तीच्या वेळी कोणत्याही रँकवर अर्जदार असला तरी शिपाईपदी भरती करण्यात येईल. परंतु सेवानिवृत्त जे.सी.ओ नायब सुभेदार रँकमध्ये भरती करण्यात येतील. भरती केल्यानंतर काम असमाधानकारक असल्यास त्यांना आदेशासह सेवा मुक्त करण्यात येईल.
अर्जदाराच्या विरोधात पोलिस तक्रारगुन्हा दाखल नसावा. कोणत्याही न्यायालयाकडून शिक्षा झालेली नसावी. एकापेक्षा अधिक लग्न केलेल्या व्यक्तीचा अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.  या सेवेसाठी पेंशन लागू नाही. भरतीनंतर जेसीओचे वय 55 वर्षेजवानाचे वय 50 वर्षपर्यंत सेवा करता येऊ शकते.  भरतीसाठी शारीरिक क्षमता उंची 160 सेंमी.वजन 50 किलो आणि छाती 82 सेंमी असावी.  सात ‍मिनीट सेकंदात एक मैल धावणेनऊ फूट लांब उडी मारणेमचाणावर चालण्याची योग्यतावयानुसार बीम करण्याची योग्यता असावी. योग्य उमेवारांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे,  असे बटालियनच्यावतीने कळविले आहे.
*****

No comments:

Post a Comment