Wednesday, 11 December 2019

ग्रंथालयांना असमान निधी योजनेंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन


मुंबईदि. 11 : भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानकोलकाता व महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने असमान निधी योजनेंतर्गत इमारत बांधकाम / विस्तार व नुतनीकरण या योजनेसाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना ग्रंथालय संचालनालयमहाराष्ट्र राज्यनगर भवनमुंबई यांच्या मार्फत दरवर्षी अर्थसहाय्य देण्यात येते. त्या संदर्भातील नियम,अटी व अर्जाचा नमुना www.rrrlf.nic.in या प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुकांनी या संकेतस्थळावरून उपलब्ध (download) करून या योजनेअंतर्गत अर्ज करावा असे आवाहन ग्रंथालय संचालक सुभाष राठोड यांनी परिपत्रकाद्वारे केले आहे.
सन 2019-20 साठी 5 वेगवेगळ्या असमान निधी योजना आहेत. 1.ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथसाधनसाम्रगीफर्निचरइमारत बांधकाम व इमारत विस्तार यासाठी असमान निधीतून अर्थसहाय्य, 2.राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञान कोपरा विकसित करण्यासाठी अर्थसहाय्यमहोत्सवी वर्ष जसे 50/60/75/100/125/150 वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य, 3.राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्रकार्यशाळा, 4.प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय्य, 5.बाल ग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय बाल कोपरा स्थापन करण्यासाठी अर्थसहाय्य अशा पाच प्रमुख असमान निधी योजना आहेत.
राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनांबाबत इच्छुकांनी संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच अधिक माहितीसाठी प्रतिष्ठानचे www.rrrlf.nic.in  हे संकेतस्थळ पहावे. ग्रंथालयांनी असमान निधी योजनेंतर्गत इमारत बांधकाम / विस्तार व नुतणीकरणासाठीचा प्रस्ताव (विहित नमुद पद्धतीत) आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह इंग्रजी / हिंदी भाषेत चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास 20 डिसेंबर 2019 पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावेत, असे  ग्रंथालय संचालक यांनी कळविले आहे.
००००

No comments:

Post a Comment