Wednesday, 11 December 2019

राज्य निवडणूक आयोगाकडे एकूण 260 राजकीय पक्षांची नोंदणी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आता 190 मुक्त चिन्हे
मुंबईदि. 11 : राज्य निवडणूक आयोगाकडे एकूण 260 राजकीय पक्षांची नोंदणी झाली असून यापैकी 16 मान्यताप्राप्त राजकीय पक्ष असल्याने त्यांची निवडणूक चिन्हे आरक्षित आहेत. उर्वरित 244 नोंदणीकृत राजकीय पक्षतसेच अपक्ष उमेदवारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आता 48 ऐवजी 190 मुक्त चिन्हे निश्चित केली आहेतअशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.
श्री. मदान यांनी सांगितले कीराज्यातील ग्रामपंचायती वगळता अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षीय पातळीवर लढविल्या जातात. त्यासाठी संबंधित राजकीय पक्षांना राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी करणे बंधनकारक असते. भारत निवडणूक आयोगाकडून मान्यताप्राप्त पक्षाने राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी केल्यास संबंधित पक्षाचे निवडणूक चिन्ह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीदेखील आरक्षित केले जाते. राज्य निवडणूक आयोगाकडे अशा एकूण 16 पक्षांनी नोंदणी केली आहे. त्यात सहा राष्ट्रीयदोन महाराष्ट्रातील राज्यस्तरीयतर आठ इतर राज्यातील राज्यस्तरीय राजकीय पक्षांचा समावेश आहे. उर्वरित 244 नोंदणीकृत राजकीय पक्ष आहेत. यांच्यासाठी कुठलेही निवडणूक चिन्ह आरक्षित नसते. हे सर्व मिळून आतापर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडे एकूण 244 राजकीय पक्षांची नोंदणी झाली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या 18 जानेवारी 2017 च्या अधिसूचनेनुसार 48 मुक्त चिन्हे निश्चित करण्यात आली होती. त्यात आता 30 नोव्हेंबर 2019 रोजीच्या अधिसूचनेनुसार 142 नव्या चिन्हांची भर घालण्यात आली आहे. त्यामुळे ही संख्या आता 190 झाली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष (कणीस आणि विळा)भारतीय जनता पार्टी (कमळ)नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (घड्याळ)भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी (हातोडा विळा व तारा)बहुजन समाज पक्ष (हत्ती)भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (हात) या राष्ट्रीय पक्षांसाठी आणि शिवसेना (धनुष्यबाण) व महाराष्ट्र नवनिर्माण सेना (रेल्वे इंजिन) या महाराष्ट्रातील राज्यस्तरीय पक्षांसाठीतसेच जनता दल सेक्यूलर (डोक्यावर भारा घेतलेली स्त्री)समाजवादी पार्टी (सायकल)इंडियन युनियन मुस्लिम लीग (शिडी)लोक जनशक्ती पार्टी (बंगला)ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कझगम (दोन पाने)जनता दल युनायटेड (बाण)ऑल इंडिया मजलिस हत्तेहदूल मुस्लिमीन (पतंग) व आम आदमी पार्टी (झाडू) या इतर राज्यातील राज्यस्तरीय पक्षांसाठी संबंधित निवडणूक चिन्हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीदेखील आरक्षित आहेतअसेही श्री. मदान यांनी सांगितले.
राज्य निवडणूक आयोगाच्या 30 नोव्हेंबर 2019 च्या अधिसूचनेनुसार मुक्त चिन्हांची यादी (यातील 48 क्रमांकापर्यंतची चिन्हे यापूर्वीदेखील होती): 1) कपाट2) ब्रश3) डिझेल पंप4) इस्त्री5) करवत6) तंबू7) फुगा8) केक9) विजेचा खांब10) जग11) कात्री12) व्हायेलीन13) टोपली14) कॅमेरा15) काटा16) किटली17) शिवणयंत्र18) चालण्याची काठी19) बॅट20) मेणबत्ती21) कढई22) शटल23) शिटी24) फलंदाज25) छताचा पंखा26) गॅस सिलेंडर27) पत्रपेटी28) पाटी29) विजेरी (टॉर्च)30) कोट31) काचेचा पेला32) मका33) स्टूल34) फळा35) नारळ36) हार्मोनियम37) नगारा38) टेबल39) पाव40) कंगवा41) हॅट42) अंगठी43) टेबल लॅम्प44) ब्रिफकेस45) कपबशी46) आईसक्रीम47) रोड रोलर 48) दूरदर्शनसंच49) एअर कंडिशनर50) सफरचंद51) ऑटो रिक्षा52) पांगुळ गाडा53) मण्यांचा हार54) पट्टा55) बाकडे56) सायकल पंप57) दुर्बिण58) बिस्किट59) होडी60) पुस्तक61) पेटी62) ब्रेड टोस्टर63) विटा64) बादली65) बस66) गणकयंत्र67) ढोबळी मिर्ची68) गालिचा69) कॅरम बोर्ड70) खटारा71) फुलकोबी72) सीसीटीव्ही कॅमेरा73) साखळी74) जाते75) पोळपाट लाटणे76) बुद्धिबळ77) चिमणी78) चिमटी/ क्लिप79) नारळाची बाग80) रंगाचा ट्रे व ब्रश81) संगणकाचा माऊस82) संगणक83) क्रेन84) घन ठोकळा85) हिरा86) डिश अँन्टेना87) दरवाज्याची घंटी88)दरवाज्याची मूठ89) ड्रील मशीन90) डंबेल्स91) कानातले दागिने (कर्णफुले)92) लिफाफा93)एक्सटेंशन बोर्ड94) बासुरी95) फूटबॉल96) कारंजे97) नरसाळे98) ऊस99) भेट वस्तू100) आले101) चष्मा102) द्राक्षे103) हिरवी मिरची104) हात गाडी105) हेड फोन106) हेलिकॉप्टर107) हेल्मेट108) हॉकी109) वाळूचे घड्याळ110) पाणी गरम करण्याचे हिटर111) फणस112) चावी113) भेंडी114) लॅपटॉप115) कडी116) लाईटर117) ल्यूडो118) जेवणाचा डब्बा119) काडेपेटी120) माईक121) मिक्सर122) नेल कटर123) गळ्यातील टाय124) कढई125) भूईमुग126) पेर127) वाटाणे128) पेन ड्रॉईव्ह129) पेनाची नीब130) पेन स्टॅंड131) कंपास पेटी132) पेन्सिल शार्पनर133) खलबत्ता134) पेट्रोल पंप135) फोन चार्जर136) उशी137) अननस138) प्लास्टर थापी139) जेवणाची थाळी140) घागर141) पंचिंग मशीन142) फ्रिज143) रूम कुलर144) रबरी शिक्का145) सेफ्टी पीन146) करवत147) शाळेची बॅग148) स्कुटर149) बोट150) शटर151) शितार152) दोरी उडी153) साबण154) मोजे155) सोफा156) पाना157) स्टॅप्लर158) स्टेथोस्कोप159) स्टम्प160) सूर्यफूल161) झोका162) स्वीच बोर्ड163) इंजेक्शन164) टीव्ही रिमोट165) टॅक्सी166) चहाची गाळणी167) दूरध्वनी168) भाला फेकणारा169) नांगर170) चिमटा171) दातांचा ब्रश172) दातांची पेस्ट173) टॅक्टर174) बिगूल175) तुतारी176) टाईप रायटर177) टायर्स178) छत्री179) वॅक्यूम क्लिनर180) वॉल हूक181) पाकिट182) अक्रोड183) कलिंगड184) पाण्याची टाकी185) विहीर186) पवन चक्की187) खिडकी188) सूप189) कॅन आणि  190) लोकरीचा गुंडा व सुई.
०-०-०

No comments:

Post a Comment