मुंबई,
दि. 27 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
निर्मित ‘जय महाराष्ट्र’ व ‘दिलखुलास’ कार्यक्रमात 'समतोल पर्यावरण, अग्रेसर
पर्यटन' या विषयावर पर्यटन , पर्यावरण,
आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांची विशेष मुलाखत प्रसारित
होणार आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दि. 28 जानेवारी रोजी सायंकाळी 7.30 वाजता प्रक्षेपित
होणार आहे. तर राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून मंगळवार दि. 28 जानेवारी आणि बुधवार दि. 29 जानेवारी रोजी
सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत
प्रसारित होईल. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
पर्यटन आणि पर्यावरण विभागासमोरची आव्हाने, पर्यटन वाढीसाठी करण्यात येणारे प्रयत्न, पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती व्हावी यासाठी करण्यात येणारे
प्रयत्न, पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठीच्या उपाययोजना,
मुंबई २४ तास हा महत्वाकांक्षी उपक्रम, पर्यावरण
संरक्षणासाठी उचलण्यात येणारी पाऊले तसेच प्लास्टिक बंदीची गरज आदी विषयांची माहिती
श्री. ठाकरे यांनी ‘जय महाराष्ट्र’ व ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.
००००
No comments:
Post a Comment