Saturday, 1 August 2020

अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन



        नागपूर, दि. 1 : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त मिलिंद साळवे यांनी त्यांच्या प्रतिमेस  पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नायब तहसीलदार अनिल निनावे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालय
   साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी त्यांच्या प्रतिमेस 
 पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडकेनिवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजीउपजिल्हाधिकारी अविनाश कातडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

*****





No comments:

Post a Comment