नागपूर, दि. 28 : महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) नागपूर खंडपीठाच्या
22 मार्च 2025 रोजी झालेल्या लोकअदालतीत एकूण 187 पैकी 48 प्रकरणांचा निपटारा करण्यात
आला.
मॅटच्या नागपूर खंडपीठाचे उपाध्यक्ष न्या.एम.जी.गिरटकर, न्यायिक सदस्य न्या. विनय जोशी, प्रशासकीय सदस्य नितीन गद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली 22 मार्च रोजी सिव्हील लाईन्स परिसरातील, प्रशासकीय इमारत क्र.1 मध्ये मॅटच्या खंडपीठामध्ये लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, नागपूर खंडपीठ (मॅट)
आणि उच्च न्यायालयाच्या विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोक अदालतीमध्ये
मॅट चे दोन पॅनल तयार करण्यात आले होते.
000000


No comments:
Post a Comment