नागपूर, दि. ८ : आपल्या विभागाचे वसतिगृह अतिशय सुंदर व सुसज्ज असे आहे. प्रत्येक विद्यार्थी हा आपले करीअर घडविण्यासाठी येथे येत असतो. त्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे वसतिगृहातील मुला मुलींना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यावर विशेष भर असतो, असे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.
दीक्षाभूमी
परीसरात सुरु असलेल्या संत चोखामेळा परीसरातील नवीन वसतिगृह बांधकामाचा मंत्री श्री.
शिरसाट यांनी आढावा घेतला. संत चोखामेळा वसतिगृह
परिसरातील इमारतीमध्ये नागपूर शहरातील मुलींचे सर्व वसतिगृह कायमस्वरुपी स्थलांतरीत
करण्याच्या शासनाच्या आदेशान्वये सध्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, सतरंजीपुरा,
नागपूर हे वसतिगृह कार्यरत आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय
वसतिगृह, गड्डीगोदाम, नागपूर हे वसतिगृह सद्यस्थितीत भाडेतत्वावरील इमारतीमध्ये कार्यरत
आहे. गृहपाल यांच्या निवासाकरीता बांधण्यात आलेल्या स्टॉफ क्वार्टरचे बांधकाम पुर्ण
झालेले आहे.
उत्तर
भागामध्ये बेसमेंट, ग्राऊंड फ्लोअर व आठ माळयांचे बांधकाम करावयाचे असून त्यापैकी आठ
माळयाचे स्लॅबचे आणि प्लास्टरचे बांधकाम पुर्ण झालेले आहे. इलेक्ट्रिक वायरींगचे आतील
काम पुर्ण झालेले आहे. दरवाजाचे फ्रेम, खिडक्यांची ग्रील, पुटींग, पेटींग आणि प्लबींगची
कामे पुर्ण झालेली आहे. इमारतीचे बांधकाम पुर्ण झालेले आहे.
दक्षिण
विभागामध्ये बेसमेंट, ग्राऊंड फ्लोअर व माळयाचे स्लॅबचे व प्लास्टरचे बांधकाम पुर्ण
झालेले आहे. दरवाजाचे फ्रेम, खिडक्यांची ग्रील, पुटींग, पेटींग, इलेक्ट्रिक आणि प्लबींगची
कामे पूर्ण झाली. इमारतीचे बांधकाम पुर्ण झालेले आहे, असे नागपूर महानगर प्रदेश प्राधिकरणच्या
अधिकाऱ्यांनी मंत्री महोदयांना सांगितले. विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी
सुविधा या ठिकाणी उपलब्ध करुन दिल्या जात आहेत.
तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
125 व्या जयंती निमित्त मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह वसंतनगर नागपूर येथे श्री.
सिरसाट यांनी भेट दिली. वसतिगृहातील विद्यार्थीनींशी चर्चा केली, त्यांच्या समस्या
जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे
प्रधान सचिव डॉ. हर्षवर्धन कांबळे, सहआयुक्त (शिक्षण), समाज कल्याण आयुक्तालय श्री.
प्रमोद जाधव, प्रादेशिक उपायुक्त प्रसाद कुळकर्णी,
सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, सहाय्यक आयुक्त चंद्रपूर विनोद मोहतुरे, सहाय्यक आयुक्त
गोंदिया किशोर भोयर, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment