Tuesday, 13 January 2026

जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांना विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

 

 

नागपूर, दि.12 : छत्रपती शिवाजी महाराज व रयतेच्या मातोश्री जिजाऊ माँ साहेब आणि भारताच्या आधुनिक युगाशी मेळ घालणारे व भविष्यातील समन्वयशील मानवसंस्कृतीची दिशा दाखवणारे श्रेष्ठ संन्यासी व थोर विचारवंत स्वामी विवेकानंद यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली.

        आयुक्तालयात आयोजित कार्यक्रमात सामान्य प्रशासन अपर आयुक्त तेजुसिंग पवार  यांनी जिजाऊ माँ साहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. रोहयो सहआयुक्त अविनाश हदगल यांच्यासह उपस्थित अधिकारी-कर्मचारी यांनीही प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

                      

 

00000

 

 


No comments:

Post a Comment