नागपूर जिल्ह्यासाठी तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर
नागपूर, दि. २० : विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी शासकीय आदेशाद्वारे नागपूर जिल्ह्यासाठी
तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत.
या आदेशानुसार
शुक्रवार,११ सप्टेंबर 2026 रोजी तान्हा पोळ्याची, शुक्रवार ,18 सप्टेंबर 2026 रोजी
महालक्ष्मी पुजन (ज्येष्ठ गौरी पुजन) आणि बुधवार ,14 ऑक्टोंबर 2026 रोजी धम्मचक्र प्रवर्तन
दिनाची सुट्टी नागपूर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांना जाहीर करण्यात आली आहे.
हा आदेश नागपूर जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालय आणि अधिकोष (बँक)यांना लागू
राहणार नाही, असे आदेशात म्हटले आहे.

No comments:
Post a Comment