Friday, 27 February 2026


 #हिंद_दी_चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी के 350वें शहीदी समागम की भव्य तैयारियाँ !


श्रद्धा और सेवा का संगम, जहाँ हर कोना गुरु साहिब की महिमा से सजाया जा रहा है। आइए, इस पावन अवसर का हिस्सा बनें।


ओवे मैदान, खारघर, नवी मुंबई। 28 फरवरी और 1 मार्च, 2026


#Guru TeghBahadurJi


#khargharsamagam


#navimumbai


#guruteghbahadursahibji


 #हिंद_दी_चादर  श्री गुरु तेग बहादुर साहिब जी के ३५० वा शहीदी समागम नवी मुंबई के खारघर में आयोजित होने जा रहे इस पावन अवसर का हिस्सा बनें।


आइए, गुरु साहिब के अद्वितीय त्याग और राष्ट्रीय एकता, धर्म, मानवता, की रक्षा के लिए दी गई उनकी शहादत को नमन करें।


यह समागम देश के सम्माननीय अतिथि और अनेक संत महंतों की उपस्थिति में संपन्न होने जा रहा है।


स्थानः ओवे मैदान, सेक्टर 29, खारघर, नवी मुंबई


दिनांक: 28 फरवरी और 1 मार्च 2026


समयः सुबह 8:00 से रात 10:00 बजे तक


आपकी उपस्थिति प्रार्थनीय है।


 #हिंद_दी_चादर गुरु तेग बहादूर जी यांच्या त्यागाची आणि धैर्याची शौर्यगाथा. या चिमुरडीने सादर केलेली ही भावपूर्ण आदरांजली नक्कीच तुमच्या मनाला स्पर्श करेल.


#GuruTeghBahadurJi

#khargharsamagam

#navimumbai

#guruteghbahadursahibji


 #हिंद_दी_चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी के 350वें शहीदी समागम में आने वाली संगत के लिए पार्किंग गाइड।


कल्याण, मुंब्रा, तलोज़ा, नाशिक, धुले, जलगाँव, नंदुरबार, छत्रपति संभाजीनगर और अहिल्यानगर से आने वाले श्रद्धालुओं के लिए 'ब्लू पार्किंग ज़ोन' निर्धारित किया गया है। सुगम यात्रा के लिए कृपया निर्देशों का पालन करें।


 #हिंद_दी_चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी के 350वें शहीदी समागम में आने वाली संगत के लिए पार्किंग गाइड।


कल्याण, मुंब्रा, तलोज़ा, नाशिक, धुले, जलगाँव, नंदुरबार, छत्रपति संभाजीनगर और अहिल्यानगर से आने वाले श्रद्धालुओं के लिए 'ब्लू पार्किंग ज़ोन' निर्धारित किया गया है। सुगम यात्रा के लिए कृपया निर्देशों का पालन करें।


 #हिंद_दी_चादर  श्री गुरु तेग बहादुर साहिब जी के 350वें शहीदी समागम के लिए 'ऑरेंज पार्किंग' गाइड


रायगढ़, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापुर और सोलापुर से आने वाली संगत के लिए विशेष व्यवस्था !

Thursday, 26 February 2026

डॉक्टरांचे समाजावर मोठे उपकार ;निरोगी समाजासाठी डॉक्टरांनी जनजागृती करावी - राज्यपाल आचार्य देवव्रत




डॉक्टरांचे समाजावर मोठे उपकार ;निरोगी समाजासाठी डॉक्टरांनी जनजागृती करावी

           - राज्यपाल आचार्य देवव्रत


नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याची गरज 



 दया, करुणा आणि सहिष्णू भावाने कार्य करत रुग्णांना जीवदान देणाऱ्या डॉक्टरांचे समाजावर मोठे उपकार आहेत असा गौरव करत निरोगी समाज घडविण्यासाठी डॉक्टरांनी जनजागृती करावी, असे आवाहन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज येथे केले.


    निरोगी समाजासाठी शुद्ध हवा, पाणी व मातीची गरज आहे त्यासाठी नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सर्व समाज घटकांनी पुढे येण्याची गरजही राज्यपालांनी व्यक्त केली.


      आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टर्सना राज्यपालांच्या हस्ते लोकमत टाईम्स एक्सलन्स इन हेल्थ केअर पुरस्काराचे वितरण येथील सेंटर पॉईंट हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.राज्यपालांच्या सुविद्य पत्नी दर्शनादेवी देवव्रत, आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे, लोकमत माध्यम समुहाचे प्रमुख विजय दर्डा, पद्मश्री डॉ. विकास महात्मे, पद्मश्री चंद्रशेखर मेश्राम, आयएमएच्या अध्यक्ष मंजुषा गिरी आदी यावेळी उपस्थित होते.


     राज्यपाल आचार्य देवव्रत  म्हणाले, देशात कोरोना सारख्या  जागतिक महामारीच्या कठीण काळात डॉक्टर, नर्स आणि वैद्यक व्यवसायातील सर्व घटकांनी जीवाची बाजी लावत रुग्णसेवेचे मोलाचे योगदान दिले. भारतीय संस्कृतीचा आधार असणाऱ्या वेदांमध्ये दुसऱ्यांप्रती सह वेदना भाव व्यक्त करणाऱ्या मानवतेला प्राधान्य दिले आहे. हाच मानवतेचा भाव वैद्यकीय क्षेत्रात दिसून येतो. आरोग्य सेवा  मानवतेचे प्रतीक असल्याचे सांगून समाजात वेगाने वाढत असलेल्या रोगांच्या पार्श्वभूमीवर निरोगी समाज घडविण्यासाठी डॉक्टरांनी जनजागृती करावी असे राज्यपाल देवव्रत यांनी सांगितले.


           निसर्गाच्या जवळ जाणे हे निरोगी समाजाचे लक्षण असून निसर्गापासून लांब जाणे हे रोगी समाजाचे लक्षण आहे. पौष्टिक अन्न सर्वांना मिळाले पाहिजे मात्र चुकीच्या खानपान सवयीमुळे समाजात रोगांचे प्रमाण दिसत आहे. पौष्टिक व कसदार अन्नधान्य निर्मितीसाठी नैसर्गिक शेती ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. शुद्ध हवा, पाणी व माती प्रत्येकाला मिळावी यासाठी नैसर्गिक शेती ही एक चळवळ बनली पाहिजे त्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याची गरज आहे त्यांनी व्यक्त केली.


     विजय दर्डा यांनी स्वागतपर भाषण केले.

            ०००००

 


 "हिंद-दी-चादर" श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा ३५० वा शहीदी समागम! 🙏✨


नवी मुंबईतील खारघर येथे 'भाई ओंकार सिंह जी' (हजुरी रागी, श्री दरबार साहिब) यांच्या सुमधुर कीर्तन आणि कथेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व भाविकांनी या मंगल प्रसंगी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा.


📅 तारीख: २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६

🕗 वेळ: सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत

📍 ठिकाण: ओवे मैदान, सेक्टर २९, खारघर, नवी मुंबई.

#khargharsamagam #ShahidiSamagam #navimumbai #guruteghbahadursahibji #kharghar


 🙏 “हिंद-दी-चादर” 🙏

श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमनिमित्त

विशेष कीर्तन व कथा — भाई सरबजीत सिंग जी, पटना साहिब


🗓️ २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६

📍 ओवे मैदान, सेक्टर २९, खारघर, नवी मुंबई


धर्म, त्याग आणि मानवतेचा संदेश अनुभवण्यासाठी उपस्थित राहा.

वाहेगुरू जी का खालसा, वाहेगुरू जी की फतेह! ✨

#khargharsamagam #ShahidiSamagam #navimumbai #guruteghbahadursahibji #khargha


 "हिंद-दी-चादर" श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त विशेष कीर्तन व कथा सोहळा! 🚩


हजुरी रागी सर दरबार साहिबचे भाई कर्नैल सिंह जी यांच्या मधुर वाणीतून कीर्तन आणि कथेचे श्रवण करण्याची सुवर्णसंधी.


🗓 दिनांक: २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६

🕗 वेळ: सकाळी ८:०० ते रात्री १०:०० पर्यंत

📍 स्थळ: ओवे मैदान, सेक्टर २९, खारघर, नवी मुंबई.


या आध्यात्मिक सोहळ्याला नक्की उपस्थित राहा. 🙏


#khargharsamagam #ShahidiSamagam #navimumbai #guruteghbahadursahibji #kharghar



 उत्सव भव्यतेचा, गौरव इतिहासाचा! 'हिंद दी चादर' कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आयोजकांची कार्यक्रमस्थळी बैठक संपन्न झाली. प्रत्येक पाऊल आता सोहळ्याच्या दिशेने...

#GuruTeghBahadurJi #ShaheediSamagam #HindDiChadar #Kharghar #NaviMumbai #Sikhism


 #हिन्द_दी_चादर टीम की ओर से श्री गुरु सिंह सभा, लोनावला के प्रबंधकों और समूह संगत को आगामी धार्मिक समागम के लिए प्रेमपूर्वक निमंत्रण दिया गया।


इस विशेष अवसर पर संस्था के सदस्यों ने गुरुद्वारा साहिब पहुँचकर पोस्टर का विमोचन किया और प्रबंधक कमेटी को समागम में शामिल होने का न्योता दिया।


धर्म और मानवता की रक्षा करने वाले नौवें पातशाह श्री गुरु तेग बहादुर साहिब जी की महिमा को समर्पित इस समागम में आप सभी सादर आमंत्रित हैं।


#GuruTeghBahadurJi #ShaheediSamagam #HindDiChadar #Kharghar #NaviMumbai #Sikhism


 #हिंद_दी_चादर 


गोवा के स्वामी हरिश्रद्धानंद सरस्वती के साथ जुड़िए, जो श्री गुरु तेग बहादुर साहिब जी के ३५०वें शहीदी समागम के अवसर पर उनके महान बलिदान और विरासत को नमन कर रहे हैं।


इस प्रेरणादायक संदेश में, स्वामी जी भक्त नामदेव जी की वाणी का उल्लेख करते हुए हमें याद दिलाते हैं कि ईश्वर वनों में भटकने से नहीं, बल्कि हमारे भीतर ही समाया हुआ है। यह आयोजन महाराष्ट्र और पंजाब के अटूट रिश्ते का प्रतीक है और हम सभी को अंतर्मुखी भक्ति के मार्ग पर चलने की प्रेरणा देता है।


#GuruTeghBahadurJi

#shaheedisamagam 

#HindDiChadar

#kharghar 

#Sikhism


 नवी मुंबईत आयोजित #हिंद_दी_चादर गुरु तेगबहादुर साहिबजींच्या ३५० व्या शहीदी समागमात सहभागी होण्यासाठी गुरप्रीत कौरने दिलेले हे खास निमंत्रण !


स्थळ: ओवे मैदान, सेक्टर २९, खारघर, नवी मुंबई.


दिनांक: २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६.


वेळ: सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत.

#GuruTeghBahadurJi

#ShaheediSamagam

#HindDiChadar

#Kharghar

#NaviMumbai

#Sikhism

Wednesday, 25 February 2026





महाराष्ट्र ही नररत्नांची खाण आहे. या राज्याने देशाला दिशा दिली. याच भूमीत नकारात्मक विचार त्यागून सकारात्मकतेची कास धरत आंतरिक शांती, परस्पसौहार्दतेतून  ब्रह्मकुमारीच्या एकता आणि विश्वासाची मोहीम प्रभावीपणे कार्य करेल व महाराष्ट्रासह देशात सुवर्णयुग अवतरेल, असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज येथे व्यक्त केला.


     एकमेकांप्रती विश्वास-सौहार्दता-एकता आणि मानवतेच्या मूल्यांची जपणूक अधिक वृद्धिंगत व्हावी, यासाठी ‘एकता व विश्वासाच्या माध्यमातून स्वर्णिम महाराष्ट्राची निर्मिती ’ या ब्रह्माकुमारीजच्या अभियानाचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते जामठातील विश्वशांती सरोवर येथे आयोजित कार्यक्रमात शुभारंभ झाला. त्यावेळी राष्ट्रपती बोलत होत्या.राज्यपाल आचार्य देवव्रत, महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माऊंटआबू येथील ब्रह्माकुमारीजचे अतिरिक्त महासचिव बी. के. मृत्युंजय भाई, राजयोगिनी बी. के. चंद्रिका दीदी, नागपूर प्रमुख राजयोगिनी बी. के. रजनी दीदी आदी यावेळी उपस्थित होते.


     राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, महाराष्ट्राच्या भूमीतील छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, स्वातंत्र्य वीर सावरकर आदी महान रत्नांनी देश व जगाला सामाजिक समरसता व राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला.  स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही राज्याने देशाच्या विकासात महत्वाचे योगदान दिले आहे. याच महाराष्ट्रात ब्रह्माकुमारीजच्या एकता व विश्वासआधारित राज्यव्यापी  अभियानाचा शुभारंभ होत आहे. यातून आत्मशांती, परस्पर सौहार्द, सकारात्मक विचार आदी जीवनमूल्यांचा समाजात प्रसार होऊन समृद्ध राज्य घडण्यासाठी प्रेरणा मिळेल.हाच मार्ग पुढे देशभर प्रशस्त होऊन परस्परातील भेदभाव सोडून करुणा,परस्पर प्रेम व समन्वयातून विकसित भारतासाठी सर्व जनता एकतेच्या धाग्यात गुंफली जाईल,असे राष्ट्रपती मुर्मू यांनी सांगितले.


 


 #हिंद_दी_चादर' श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमनिमित्त आरोग्य शिबिर संपन्न! 


दि. २४/०२/२०२६ रोजी उपजिल्हा रुग्णालय, कणकवली येथे विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ४४६ लाभार्थ्यांची तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली विनामूल्य आरोग्य तपासणी व उपचार करण्यात आले. मानवसेवेच्या या कार्यात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार!


#khargharsamagam #ShahidiSamagam #navimumbai #guruteghbahadursahibji #kharghar


 #हिंद_दी_चादर आरोग्य शिबिर संपन्न! 


श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त, ग्रामीण रुग्णालय देवगड येथे विशेष आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.


प्रमुख उपस्थिती: जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांचे मार्गदर्शन.


लाभार्थी: ३६२ नागरिकांची मोफत तपासणी.


तपासणी: मधुमेह, कॅन्सर निदान, माता-बाल संगोपन आणि इतर विविध आजार.


डॉ. पाटोदेकर आणि त्यांच्या संपूर्ण वैद्यकीय पथकाने या शिबिरात आपले मोलाचे योगदान दिले. समाजातील गरजूंपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न!

#khargharsamagam #ShahidiSamagam #navimumbai #guruteghbahadursahibji #kharghar


 श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी दिनानिमित्त विशेष आरोग्य शिबिर संपन्न! 🙏🏥


#हिंद_दी_चादर मोहिमेतंर्गत ग्रामीण रुग्णालय, मालवण येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात १२८ रुग्णांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व औषधोपचार करण्यात आले. जनसेवेच्या या कार्यातून गुरुजींना विनम्र अभिवादन करण्यात आले.

#khargharsamagam #ShahidiSamagam #navimumbai #guruteghbahadursahibji #kharghar

#हिंद_दी_चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमनिमित्त आरोग्य शिबिर संपन्न!


 

दि. २४/०२/२०२६ रोजी उपजिल्हा रुग्णालय, कणकवली येथे विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ४४६ लाभार्थ्यांची तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली विनामूल्य आरोग्य तपासणी व उपचार करण्यात आले. मानवसेवेच्या या कार्यात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार!


#khargharsamagam #ShahidiSamagam #navimumbai #guruteghbahadursahibji #kharghar


 #हिंद_दी_चादर आरोग्य शिबिर संपन्न! 


श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त, ग्रामीण रुग्णालय देवगड येथे विशेष आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.


प्रमुख उपस्थिती: जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांचे मार्गदर्शन.


लाभार्थी: ३६२ नागरिकांची मोफत तपासणी.


तपासणी: मधुमेह, कॅन्सर निदान, माता-बाल संगोपन आणि इतर विविध आजार.


डॉ. पाटोदेकर आणि त्यांच्या संपूर्ण वैद्यकीय पथकाने या शिबिरात आपले मोलाचे योगदान दिले. समाजातील गरजूंपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न!


#khargharsamagam #ShahidiSamagam #navimumbai #guruteghbahadursahibji #kharghar

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी दिनानिमित्त विशेष आरोग्य शिबिर संपन्न! 🙏🏥




#हिंद_दी_चादर मोहिमेतंर्गत ग्रामीण रुग्णालय, मालवण येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात १२८ रुग्णांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व औषधोपचार करण्यात आले. जनसेवेच्या या कार्यातून गुरुजींना विनम्र अभिवादन करण्यात आले.


#khargharsamagam #ShahidiSamagam #navimumbai #guruteghbahadursahibji #khargha


 #हिंद_दी_चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमननिमित्त भव्य आरोग्य शिबिर! 


उपजिल्हा रुग्णालय, कणकवली येथे डॉ. श्रीपाद पाटील आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वीरित्या पार पडले. या उपक्रमाद्वारे ४४६ लाभार्थ्यांना मोफत अत्याधुनिक वैद्यकीय सेवा आणि उपचार प्रदान करण्यात आले. मानवसेवेचा हा एक छोटासा प्रयत्न!


#khargharsamagam #ShahidiSamagam #navimumbai #guruteghbahadursahibji #kharghar


 ब्रह्माकुमारीजच्या राज्यव्यापी अभियानाचा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ



नागपूर :



  एकमेकांप्रती विश्वास-सौहार्दता-एकता आणि मानवतेच्या मूल्यांची जपणूक अधिक वृद्धिंगत व्हावी, यासाठी राज्यव्यापी ब्रह्माकुमारीजच्या अभियानाचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते जामठातील विश्वशांती सरोवर येथे आयोजित कार्यक्रमात शुभारंभ झाला. त्यावेळी राष्ट्रपती बोलत होत्या.राज्यपाल आचार्य देवव्रत, महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माऊंटआबू येथील ब्रह्माकुमारीजचे अतिरिक्त महासचिव बी. के. मृत्युंजय भाई, राजयोगिनी बी. के. चंद्रिका दीदी, नागपूर प्रमुख राजयोगिनी बी. के. रजनी दीदी आदी यावेळी उपस्थित होते. 


       या राज्यव्यापी मोहिमेसाठी ब्रह्माकुमारीजमार्फत आठ सिद्धांत निश्चित करण्यात आले आहेत. यात व्यसनमुक्त समाजाची निर्मिती, शाश्वत जीवन पद्धती, स्वच्छता व नागरिक म्हणून प्रत्येक व्यक्तीत कर्तव्याचे भान, मानवतेसाठी कर्तव्यतत्परता, मूल्याधारित शिक्षण, निर्मळ व संयमी जीवन-योगा, हरित व शाश्वत महाराष्ट्र, सुसंवादातून आनंदी जीवन यावर भर दिला आहे. या सिद्धांतातूनच महाराष्ट्रात स्वर्णिम युगाचा प्रत्यय अधिक बळकट होणार असून राज्यातील प्रत्येक तालुका पातळीवरील ब्रह्माकुमारीजच्या केंद्रामार्फत ही मोहीम प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यात येणार आ

Tuesday, 24 February 2026









#हिंद_दी_चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त भव्य आयोजन!

या पवित्र सोहळ्याला संत श्री गोपाळ चैतन्य महाराज (रावेर) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तरी सर्व भाविकांनी या मंगलमयी सोहळ्याचा लाभ घ्यावा.

🗓️ दिनांक: २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६
🕙 वेळ: सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत
📍 स्थळ: ओवे मैदान, सेक्टर २९, खारघर, नवी मुंबई
 

Monday, 23 February 2026


 #हिंद_दी_चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या मंगल प्रसंगी राज्यमंत्री (अल्पसंख्याक विकास व औकाफ) माधुरी मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.


#khargharsamagam #ShahidiSamagam #navimumbai #guruteghbahadursahibji #kharghar

#हिंद_दी_चादर - श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांचा ३५० वा शहीदी समागम! 🙏


 #हिंद_दी_चादर - श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांचा ३५० वा शहीदी समागम! 🙏


नवी मुंबईतील खारघर येथे आयोजित या पावन सोहळ्याला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. आपण सर्व या भक्तिमय वातावरणात सहभागी व्हा.


#khargharsamagam #ShahidiSamagam #navimumbai #guruteghbahadursahibji #kharghar






 कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत गुरुगोविंद सिंग एज्युकेशन अकॅडमी येथे पार पडला ऐतिहासिक समूहगान सोहळा.

#khargharsamagam #ShahidiSamagam #navimumbai #guruteghbahadursahibji #kharghar



"अभिमानास्पद क्षण! श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त आयोजित 'हिंद-दी-चादर' समूहगान कार्यक्रमाची 'Best of India Records' मध्ये जागतिक विक्रम म्हणून नोंद. 


#khargharsamagam #ShahidiSamagam #navimumbai #guruteghbahadursahibji #kharghar

 

हिंद_दी_चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब


 #हिंद_दी_चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी के 350वें पावन शहीदी समागम के उपलक्ष्य में, आज मंत्री नितेश राणे को विशेष कार्यक्रम में सम्मिलित होने हेतु सादर निमंत्रण दिया गया।


फरवरी माह में आयोजित होने वाला यह समागम गुरु साहिब के महान त्याग और बलिदान को समर्पित है। 

#khargharsamagam #ShahidiSamagam #navimumbai #guruteghbahadursahibji #kharghar

#हिंद_दी_चादर श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त विशेष मानवंदना!


 


आश्रमशाळा साखरे येथील विद्यार्थ्यांनी समूहगीताद्वारे वीरतेचा आणि मानवतेचा संदेश गुंजवला. या गायन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवून गुरूंच्या महान त्यागला अभिवादन केले.

#khargharsamagam #ShahidiSamagam #navimumbai #guruteghbahadursahibji #kharghar


 राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नवी मुंबई येथे आयोजित 'श्री गुरु तेग बहादूर साहिब जी ३५० व्या शहीदी समागम' सोहळ्याचे आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले.


#khargharsamagam #ShahidiSamagam #navimumbai #guruteghbahadursahibji #kharghar

हिंद_दी_चादर श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त विशेष मानवंदना!


 

आश्रमशाळा साखरे येथील विद्यार्थ्यांनी समूहगीताद्वारे वीरतेचा आणि मानवतेचा संदेश गुंजवला. या गायन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवून गुरूंच्या महान त्यागला अभिवादन केले.

#khargharsamagam #ShahidiSamagam #navimumbai #guruteghbahadursahibji #kharghar

महाराजस्व समाधान शिबीरात जनतेच्या जास्तीत-जास्त समस्यांचे निराकरण करा – विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी विभागातील जिल्ह्यांचा घेतला आढावा नागपूर, दि. 23 : पुढील महिन्यापासून नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या महाराजस्व समाधान शिबीर टप्पा-1 अंतर्गत जनतेच्या जास्तीत-जास्त समस्यांचे निराकरण व्हावे या दिशेने नियोजन करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये आयोजित होणाऱ्या समाधान शिबीर अभियान टप्पा -1 च्या पूर्व तयारीचा आढावा श्रीमती बिदरी यांनी दूरदृष्यप्रणाली द्वारे घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. अपर आयुक्त महसूल राजेश खवले, सहायक आयुक्त भूसुधार शिल्पा सोनाले उपस्थित होत्या. भंडारा,गोंदिया,चंद्रपूर,गडचिरोली आणि वर्ध्याचे जिल्हाधिकारी तसेच नागपूरचे अपरजिल्हाधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. येत्या 7 आणि 14 मार्च रोजी नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका निहाय मंडळ स्तरावर समाधान शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. यानंतर 10 व 17 एप्रिल रोजीही समाधान शिबीर आयोजित करण्यात येणार आहेत.तसेच नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर 8 व 15 मे रोजी महाराजस्व समाधान शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. याअनुषंगाने सर्वांसाठी घरे, वर्ग २ ची जमीन वर्ग १ मध्ये रुपांतरीत करणे, जमीनी अकृषक करणे, तुकडेबंदी, पाणंद रस्ते,पट्टे वाटप,विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र वितरीत करणे आदींबाबत कार्यक्रम आखण्यात आला आहे. या सर्वांबाबत जिल्हानिहाय स्थितीचा आढावा घेण्यात आला. शिबीराचे स्थळ व नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्यापासून आवश्यक सोयी करण्यासह पात्र लाभार्थ्यांच्या याद्या करणे आदींबाबत श्रीमती बिदरी यांनी सूचना दिल्या. एमसँड धोरणाबाबत विभागात असलेल्या सद्यस्थितीची माहिती त्यांनी घेतली. शासकीय जमीनीवरील २०११ पूर्वीचे अतिक्रमण नियमानुकूल करून पात्र लाभार्थ्यांना करावयाच्या पट्टेवाटपाच्या स्थितीची माहितीही श्रीमती बिदरी यांनी जाणून घेतली. सर्वच पात्र लाभार्थ्यांना समाधान शिबीरामध्ये पट्टेवाटप करण्याच्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.



 

 पुढील महिन्यापासून नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये  आयोजित करण्यात येणाऱ्या महाराजस्व समाधान शिबीर टप्पा-1 अंतर्गत जनतेच्या जास्तीत-जास्त समस्यांचे निराकरण व्हावे या दिशेने नियोजन करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी  यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.


          छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये  आयोजित होणाऱ्या समाधान शिबीर अभियान टप्पा -1 च्या पूर्व तयारीचा आढावा श्रीमती बिदरी यांनी दूरदृष्यप्रणाली द्वारे घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. अपर आयुक्त महसूल राजेश खवले, सहायक आयुक्त भूसुधार शिल्पा सोनाले उपस्थित होत्या. भंडारा,गोंदिया,चंद्रपूर,गडचिरोली आणि वर्ध्याचे जिल्हाधिकारी तसेच नागपूरचे अपरजिल्हाधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.


           येत्या 7 आणि 14 मार्च रोजी नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका निहाय मंडळ स्तरावर समाधान शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. यानंतर 10 व 17 एप्रिल रोजीही समाधान शिबीर आयोजित करण्यात येणार आहेत.तसेच नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर 8 व 15 मे रोजी महाराजस्व समाधान शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. याअनुषंगाने सर्वांसाठी घरे, वर्ग २ ची जमीन वर्ग १ मध्ये रुपांतरीत करणे, जमीनी अकृषक करणे, तुकडेबंदी, पाणंद रस्ते,पट्टे वाटप,विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र वितरीत करणे आदींबाबत कार्यक्रम आखण्यात आला आहे. या सर्वांबाबत जिल्हानिहाय स्थितीचा आढावा घेण्यात आला. शिबीराचे स्थळ व नागरिकांसाठी  पिण्याच्या पाण्यापासून आवश्यक सोयी  करण्यासह  पात्र लाभार्थ्यांच्या याद्या करणे आदींबाबत श्रीमती बिदरी यांनी सूचना दिल्या. 


           एमसँड धोरणाबाबत विभागात असलेल्या सद्यस्थितीची माहिती  त्यांनी घेतली. शासकीय जमीनीवरील २०११ पूर्वीचे अतिक्रमण नियमानुकूल करून पात्र लाभार्थ्यांना करावयाच्या पट्टेवाटपाच्या स्थितीची माहितीही श्रीमती बिदरी यांनी जाणून घेतली. सर्वच पात्र लाभार्थ्यांना समाधान शिबीरामध्ये पट्टेवाटप करण्याच्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

Wednesday, 18 February 2026

‘माझी वसुंधरा अभियान 5.0’ मध्ये नागपूर विभागातील ग्राम पंचायतींना 10 राज्यस्तरीय पुरस्कार

 


विभागीय आयुक्त बिदरी यांच्या मार्गदर्शनात अभिनव यश

नागपूर, दि. 18 : माझी वसुंधरा अभियान 5.0 मध्ये राज्यस्तरावर नागपूर विभागातील ग्रामपंचायतींनी कामाची मोहर उमटविली आहे. या अभियानांतर्गत विभागातील 7 ग्रामपंचायतींची विविध श्रेणीमध्ये 10 राज्यस्तरीय पुरस्करासाठी निवड करण्यात आली असून 7 ग्रामपंचायतींना विभागीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभिनव यश प्राप्त झाले आहे.

महसुली विभागांमध्ये नागपूर विभागाने राज्यात तिसरा क्रमांक पटकाविला आहे तर जिल्हा परिषदेच्या सर्वोत्तम मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या श्रेणीत चंद्रपूरने तिसरा क्रमांक पटकाविला आहे. 

    पृथ्वी, वायू,जल, अग्नी आणि आकाश या निर्सगाशी संबंधीत पंच तत्वावर आधारित ‘माझी वसुंधरा अभियान’ राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये 2 ऑक्टोबर 2020 पासून राबविण्यात येत आहे. माझी वसुंधरा अभियान 5.0 हे राज्यातील एकूण 422 नागरी स्थानिक संस्था व 27,895 ग्राम पंचायतींमध्ये 1 जून 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत राबविण्यात आले. यामध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी निसर्गाचे पंचमहाभूत भूमी, वायू, जल, अग्नी व आकाश यामध्ये कामे केली व सर्व कामांचे डेस्कटॉप मूल्यमापन व फील्ड मूल्यमापन त्रयस्त संस्थेमार्फत करण्यात आले. माझी वसुंधरा अभियान 5.0 चा निकाल 17 फेब्रुवारी 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार विविध लोकसंख्या गटानुसार जाहीर करण्यात आला. या निकालात नागपूर विभागातील एकूण 7 ग्राम पंचायतींना 10 राज्यस्तरीय पुरस्कार व 7 ग्राम पंचायतींना प्रत्येकी एक विभागीय पुरस्कार जाहीर झाले आहेत.

                                      या 7 ग्रामपंचायतींची राज्यस्तरावर उत्तम कामगिरी

नागपूर जिल्ह्यातील 2 ग्रामपंचायतींचा समावेश

 या अभियानामध्ये विविध मानकांमध्ये सरस कामगिरी करत विभागातील 7 ग्रामपंचातींनी राज्यस्तरावर कामाची छाप सोडली आहे. यात चंद्रपूर, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी उल्लेखनीय कामगिरी करत पुरस्कारावर नाव कोरले आहे.

नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्याच्या कवठा ग्रामपंचायतीला उंच उडी गटात प्रथम क्रमांक तर हिंगणा तालुक्यातील नेरी (मानकर) ग्रामपंचायतीला सामान्य गटात राज्यस्तरावर तिसरा पुरस्कार जाहीर झाला.

चंद्रपूर जिल्हा व तालुक्याच्या दुर्गापूर ग्रामपंचायतीची उंच उडी श्रेणीमध्ये राज्यस्तरीय पहिला पुरस्कारासाठी निवड झाली आहे. याच जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील जिबगाव ग्रामपंचायतीला दुसरा तर चिखली ग्रामपंचातीला सामान्य प्रकारात पहिला व भूमी प्रकारात पुरस्कार जाहीर झाला आहे.

 गोदिंया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्याच्या डव्वा ग्रामपंचातीने सामान्य गटात दुसरा तर भूमी गटात पुरस्कार पटकाविला आहे. याच जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील भज्जीयापार ग्रामपंचायतीला सामान्य गटात राज्यस्तरावर दुसरा तर भूमी गटात पुरस्कार जाहीर झाला.

विभागीय स्तरावर या 7 ग्रामपंचायती ठरल्या अव्वल

 'माझी वसुंधरा अभियान 5.0' मध्ये विभाग स्तरावर उत्तम कामगिरी करणाऱ्या 7 ग्रामपंचायतींची नावे जाहीर करण्यात आली आहे.  यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर (ता.चंद्रपूर), बेला (ता.भंडारा, जि. भंडारा), भेजगाव (ता.मूल, जि. चंद्रपूर), नानव्हा (ता.सालेकसा, जि. गोंदिया), सिरेगाव (ता.अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया) चांपा (ता.उमरेड, जि. नागपूर) मिर्झापूर (ता.आर्वी, जि.वर्धा) या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

विभागस्तरावर जिल्हा परिषद श्रेणीमध्ये गोंदिया व भंडारा जिल्हा परिषदेला पुरस्कार जाहीर झाला आहे. सावली, कोरपना आणि भद्रावती येथील गट विकास अधिकाऱ्यांना विभागस्तरावरील तसेच जिल्हास्तरावरील पुरस्कार भंडारा, राजुरा, देसाईगंज, सालेकसा, हिंगणा, आर्वी येथील गट विकास अधिकाऱ्यांना जाहीर झाले आहे.   

 पुरस्काराचे स्वरुप 50 लाख ते 1 कोटी रुपये पर्यंत असून 21 फेब्रुवारी 2026 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

  विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी त्याचप्रमाणे विभागीय आयुक्तालयातील विकास शाखेच्या अपर आयुक्त वर्षा गौरकर आणि तत्कालीन विकास शाखेचे अपर आयुक्त कमलकिशोर फुटाणे, विभागीय नियंत्रण अधिकारी संकेत तालेवार यांनी पुरस्कारासाठी निवड झालेल्या ग्रामपंचायतींचे व जिल्हा  परिषदेचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

 

00000


‘माझी वसुंधरा अभियान 5.0’ मध्ये नागपूर विभागातील दोन नगरपरिषद व एका नगर पंचायतीला राज्यस्तरीय पुरस्कार

 




विभागीय आयुक्त बिदरी यांच्या मार्गदर्शनात अभिनव यश

नागपूर, दि. 18 : माझी वसुंधरा अभियान 5.0 मध्ये नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी नगरपरिषद आणि बेसा-पिपळा नगरपंचायतीला तसेच वर्धा जिल्ह्यातील देवळी नगर परिषदेला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. विभाग स्तरावर चंद्रपूर महानगरपालिकेला आणि गडचिरोली, ब्रह्मपुरी, देवळी आणि खापा नगरपरिषदेला विविध लोकसंख्या गटात पुरस्कार जाहीर झाले आहेत. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभिनव यश प्राप्त झाले आहे.

 पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निर्सगाशी संबंधीत पंच तत्वावर आधारित ‘माझी वसुंधरा अभियान’5.0 हे राज्यातील 422 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये 1 जून 2024  ते 31 मार्च 2025 या कालावधीत राबविण्यात आले. यामध्ये सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी निसर्गाचे पंचमहाभूत भूमी, वायू, जल, अग्नी व आकाश यामध्ये कामे केली व सर्व कामांचे डेस्कटॉप मूल्यमापन व फील्ड मूल्यमापन त्रयस्त संस्थेमार्फत करण्यात आले. माझी वसुंधरा अभियान 5.0 चा निकाल 17 फेब्रुवारी 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार विविध लोकसंख्या गटात जाहीर करण्यात आला.

माझी वसुंधरा अधियान 5.0 मध्ये गुणानुक्रमे उंच उडी श्रेणीमध्ये विविध लोकसंख्या गटात नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी नगरपरिषद आणि बेसा-पिपळा नगरपंचायतीला तसेच वर्धा जिल्ह्यातील देवळी नगर परिषदेला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. 25 ते 40 हजार लोकसंख्या गटात बुटीबोरी नगरपरिषदेला, 15 ते 25 हजार लोकसंख्या गटात देवळी नगरपरिषदेला तर 25 हजारापेक्षा कमी लोकसंख्या गटात बेसा-पिपळा नगरपंचायतीला प्रत्येकी 1 कोटी रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे.  

विभागस्तरावर अमृत गटामध्ये चंद्रपूर महानगरपालिकेला रुपये 1.50 कोटींचा पुरस्कार जाहीर झाला आहे. गडचिरोली, ब्रह्मपुरी, देवळी आणि खापा नगरपरिषदेला विविध लोकसंख्या गटात पुरस्कार जाहीर झाले आहेत. 40 हजार ते 1 लाख लोकसंख्या गटात गडचिरोली नगरपरिषद, 25 ते 40 हजार लोकसंख्या गटात ब्रम्हपुरी नगरपरिषद, 15 ते 25 हजार लोकसंख्या गटात देवळी नगरपरिषद आणि 15 हजार पेक्षा कमी लोकसंख्या गटात खापा नगरपरिषदेला प्रत्येकी रुपये 75 लाखांचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

21 फेब्रुवारी 2026 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुबंई येथे एका शासनदार समारंभात पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

00000