Wednesday, 13 May 2026

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 'नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्या'च्या बोधचिन्हाचे अनावरण संपन्न झाले. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अधिकृत बोधचिन्हामध्ये भारतीय अध्यात्म, श्रद्धा आणि सिंहस्थ परंपरेचे दर्शन घडते. भगवान शंकराचे त्रिशूळ, पवित्र श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिराची छटा व शिवलिंगाच्या स्वरुपात साकारलेली गोदावरी नदी यांचा या बोधचिन्हामध्ये अत्यंत समर्पक आणि कलात्मक वापर करण्यात आला आहे. सांस्कृतिक वारसा, भारतीय परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देणारे हे बोधचिन्ह...



#Maharashtra #DevendraFadnavis #KumbhMela2027 #LogoLaunch

No comments:

Post a Comment