आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बॅडमिंटनपटू नंदू ऊर्फ नंदकुमार महादेव नाटेकर यांचा जन्मदिन. देशाबाहेरील स्पर्धेत अजिंक्यपद मिळविणारे ते पहिले भारतीय बॅडमिंटनपटू.राष्ट्रीय स्पर्धात पुरुष दुहेरीत व एकेरीत मिळून १२वेळा, तर मिश्र दुहेरीत ५ वेळा त्यांनी अजिंक्यपद मिळवले.
कृतिशील विचारवंत, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चे संस्थापक #आत्मारामरावजीभट यांचा जन्मदिन.ते १२वर्षे विधानसभेचे सदस्य होते.१९५२मध्ये स्थापन पहिल्या 'वृत्तपत्र आयोगा'चे ते सदस्य होते.त्यांनी पुणे येथे 'मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज'ची स्थापना केली.



No comments:
Post a Comment