Friday, 3 July 2026

विशेष वृत्त :

‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2’ साठी 221 कोटींचा निधी मंजूर विभागातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ नागपूर, दि. 03 : आर्थिक वर्ष 2026-27 करिता ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2’ साठी राज्य शासनाने 221 कोटी 28 लाख 14 हजार 800 च्या निधीस मंजुरी दिली आहे. नागपूर विभागातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा जिल्ह्यांसह राज्यातील 21 जिल्ह्यातील निवड केलेल्या 7 हजार 201 गावांना याचा लाभ मिळणार आहे. हवामान बदलास अतिसंवेदनशील असलेल्या राज्यातील 7 हजार 201 गावांमध्ये ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प’ वर्ष 2025-26 पासून पुढील 6 वर्षाच्या कालावधीकरिता राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या टप्पा-2 च्या अंमलबजावणीसाठी कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या 2 जुलै 2026 च्या शासन निर्णयानूसार 221 कोटी 28 लाख 14 हजार 800 च्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे. सदर प्रकल्पाकरिता वर्ष 2026-27 या आर्थिक वर्षासाठी एकूण 442 कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. या शासन निर्णयाद्वारे नागपूर विभागातील 6 जिल्ह्यांतील गावांमध्ये ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2’ ची अंमलबजावणी करणे सोयीचे होणार असून या जिल्ह्यांतील निवड झालेल्या गावांना त्याचा लाभ होणार आहे. 000

No comments:

Post a Comment