Friday, 3 July 2026

विशेष वृत्त :

राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यासाठी 4 कोटींचा निधी मंजूर नागपूर, दि. 03 : आर्थिक वर्ष 2026-27 करिता राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीरकण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने 4 कोटींच्या निधीस मंजुरी दिली आहे. राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी औजारे, यंत्र खरेदीसाठी अनुदान देणे व कृषी औजारे, यंत्रे बॅकांना अनुदान देवून त्याची अंमलबजावणी केंद्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण उपभियानाच्या मार्गदर्शक सूचनानूसार करण्यात येते. या योजनेसाठी आर्थिक वर्ष 2026-27 करिता 20 कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे व त्यास प्रशासकीय मान्यताही प्रदान करण्यात आली आहे. याअंतर्गत कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या 2 जुलै 2026 च्या शासन निर्णयानुसार राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यासाठी 4 कोटींचा निधीस मंजूरी दिली आहे. या योजनेंतर्गत निवडलेल्या लाभार्थ्यांनांच हा निधी वितरीत करणे बंधनकारक असल्याचे शासन निर्णयात नमुद आहे. योजनेंतर्गत लाभार्थ्याची निवड महाडिबीटी पोर्टलवरील विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात लाभाची रक्कम जमा करावी, असेही शासन निर्णयात म्हटले आहे. या योजनेच्या क्षेत्रीयस्तरावर अंमलबजावणीसाठी कृषी संचालक, कृषी अभियांत्रिकी संचालनालय, कृषी आयुक्तालय पुणे यांनी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानूसार उद्दीष्टनिहाय अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. 0000

No comments:

Post a Comment