Wednesday, 14 October 2026
नागपूर विभागात २ लाख ५५ हजार ६०३ पदवीधर मतदार
नागपूर विभागात २ लाख ५५ हजार ६०३ पदवीधर मतदार
४४५ मतदान केंद्रे
नागपूर विभाग विधानपरिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूक
नागपूर, दि. १२ - नागपूर विभाग विधान परिषद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी विभागातील सहा जिल्ह्यांत एकूण २ लाख ५५ हजार ६०३ मतदार आहेत. यामध्ये १ लाख ४७ हजार २८० पुरुष, १ लाख ८ हजार ३०१ महिला आणि २२ इतर मतदारांचा समावेश आहे. एकूण ४४५ मतदान केंद्रे असल्याचे निवडणूक विभागाकडून कळविण्यात आले आहे.
जिल्हानिहाय आकडेवारीत नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख ४४ हजार ४६६ मतदार असून, चंद्रपूर जिल्ह्यात ३२ हजार २६२, गोंदिया जिल्ह्यात २२ हजार १७६, वर्धा जिल्ह्यात २१ हजार ७४२, भंडारा जिल्ह्यात २१ हजार ३४९ आणि गडचिरोली जिल्ह्यात १३ हजार ६०८ मतदार आहेत.
नागपूर जिल्ह्यात २४६ मतदान केंद्रे असून, येथे ७६ हजार ७५४ पुरुष, ६७ हजार ६९० महिला आणि २२ इतर असे एकूण १ लाख ४४ हजार ४६६ मतदार आहेत. भंडारा जिल्ह्यात ३५ मतदान केंद्रांवर १३ हजार २४७ पुरुष आणि ८ हजार १०२ महिला असे एकूण २१ हजार ३४९ मतदार आहेत. गोंदिया जिल्ह्यात ३९ मतदान केंद्रे असून, १३ हजार ९६५ पुरुष आणि ८ हजार २११ महिला असे एकूण २२ हजार १७६ मतदार आहेत. वर्धा जिल्ह्यात ४१ मतदान केंद्रांवर १३ हजार ९९ पुरुष आणि ८ हजार ६४३ महिला असे एकूण २१ हजार ७४२ मतदार नोंदविण्यात आले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात ५८ मतदान केंद्रे असून, २० हजार ९०५ पुरुष आणि ११ हजार ३५७ महिला असे एकूण ३२ हजार २६२ मतदार आहेत. गडचिरोली जिल्ह्यात २६ मतदान केंद्रांवर ९ हजार ३१० पुरुष आणि ४ हजार २९८ महिला असे एकूण १३ हजार ६०८ मतदार आहेत.
विभागातील दिव्यांग मतदारांची संख्या १४ हजार १९७ आहे. यामध्ये ८ हजार ९३३ पुरुष, ५ हजार २६२ महिला आणि दोन इतर मतदारांचा समावेश आहे. जिल्हानिहाय विचार करता, नागपूर जिल्ह्यात ८ हजार ६४, भंडारा जिल्ह्यात १ हजार ३४, गोंदिया जिल्ह्यात १ हजार ८८७, वर्धा जिल्ह्यात ५८६, चंद्रपूर जिल्ह्यात १ हजार ९४७ आणि गडचिरोली जिल्ह्यात ६७९ दिव्यांग मतदार आहेत.
विभागात ८० वर्षांवरील मतदारांची संख्या ८५५ आहे. यामध्ये ७३८ पुरुष आणि ११७ महिला मतदारांचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्यात ८० वर्षांवरील ७२१ मतदार आहेत. भंडारा जिल्ह्यात ३६, गोंदिया जिल्ह्यात २४, वर्धा जिल्ह्यात ३६, चंद्रपूर जिल्ह्यात ३४ आणि गडचिरोली जिल्ह्यात चार मतदार या वयोगटातील आहेत.
नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक मतदार आणि मतदान केंद्रे आहेत, तर गडचिरोली जिल्ह्यात सर्वांत कमी मतदार व मतदान केंद्रे आहेत.
000000
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment