Friday, 3 April 2020

कोरोनाग्रस्त सहाय्यता निधीसाठी ‘वनराई’तर्फे एक लाखाचा धनादेश



        नागपूर, दि.3 :   ‘लॉकडाऊन’मुळे संकटात सापडलेले असंघटीत कामगार व गरजू व्यक्तींना मदत म्हणून ‘वनराई’तर्फे  एक लाखाचा धनादेश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांना  सुपुर्द करण्यात आला. आमदार राजू पारवे, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, अजय पाटील  यावेळी उपस्थित होते.
                आयटीसी कंपनीने   गरिब व गरजू व्यक्तींना देण्यासाठी जीवनावश्यक  वस्तुंचा पुरवठा करण्याचे आश्वासन दिले. यात दोन टन आटा, एक टन बिस्कीटे, तीन हजार सातशे किलो नुडल्स व पाचशे किलो चीप्स  या सामुग्रीचा समावेश आहे.

******

रेशनकार्ड नसणाऱ्या गरीब व्यक्तींची यादी तयार करा - पालकमंत्री नितीन राऊत



·         संचारबंदी नियमांचे काटेकोर पालन व्हावे
·         सोशल डिस्टन्सिंग आवश्यकच
·         लवकरच विभागनिहाय आढावा
·          
         नागपूर, दि. 3:  ‘लॉकडाऊन’च्या काळात अंत्योदय कार्डधारकांना जिल्हा प्रशासनाकडून किराणा वाटप करण्यात येणार असून ज्या मजुरांकडे राशन कार्ड नाही अशा व्यक्तींना सुध्दा किराणा वाटप गरजेचे आहे. अशा व्यक्तींची यादी तयार करुन जिल्हाधिकारऱ्यांकडे तात्काळ पाठविण्याचे आदेश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना दिले.
            उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांच्याशी आज पालकमंत्री  श्री.  राऊत यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी आमदार राजू पारवे, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे उपस्थित होते. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासन मोठ्या प्रमाणात उपाययोजना करीत आहे. अशाच उपाययोजना ग्रामीण भागात होणे गरजेचे असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले. विस्थापित व कामगारांसाठी   निवारागृह उभारण्यात आले आहे. याठिकाणी राहण्याची व्यवस्था, जेवन व आरोग्य तपासणी याची दक्षता घेण्यात यावी. निवारागृहात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी आवश्यक आहे.  
अंत्योदय कार्डधारकांना  किराणावाटप करतांना त्याठिकाणी तक्रारपेटी ठेवून ज्यांच्याकडे कार्ड नाही, अशा व्यक्तींचे अर्ज गोळा करण्यात यावे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, कार्ड नसलेल्या व्यक्तींचे अर्ज गोळा करण्याची जबाबदारी  संबंधीत दुकानदारावर सोपविण्यात यावी. कार्ड नसलेल्या व्यक्तींना किराणा देण्यासाठी यादी आवश्यक आहे.
‘होम क्वारंटाईन’ करतांना  दक्षता घेण्यात यावी, नागरिकांनी मास्क लावून जावे, तसेच भाजीपाला व किराणा  घेतांना ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळण्याकडे  कटाक्षाने लक्ष ठेवावे, ‘लॉकडाऊन’च्या काळात नागरिकांना अतिमहत्वाचे काम असल्यास पोलिसांमार्फत पासेस देण्याची व्यव्यस्था विभागीय अधिकाऱ्यांच्या स्तरावर करण्यात यावी. जेष्ठ नागरिक व महिलांना त्रास होणार नाही याकडे लक्ष द्यावे अशा सूचना डॉ. राऊत यांनी दिल्या.
***** 

Thursday, 2 April 2020

कोरोना तणावात असलेल्यांसाठी ‘डॉक्टर मला बोलायचं आहे’ उपक्रमाची आजपासून सुरुवात

* 33 नामवंत मानसोपचार तज्ज्ञांचा सहभाग
* आपल्या शंकांचे होणार निरसन
* तणाव व्यवस्थापनाचा मिळणार सल्ला
* दहा तास उपलब्ध होणार सेवा

नागपूर, दि. 2 :   कोरोनाच्या आजाराने सर्वत्र भितीचे वातावरण असून यावर प्रभावी उपचार उपलब्ध नाहीत अशा परिस्थितीत जनतेमध्ये भिती व गैरसमजामुळे मानसिक ताणतणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत असलेल्यांसाठी ‘डॉक्टर मला बोलायचं आहे’ या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून शहरातील मानसोपचार तज्ज्ञ आपल्या शंकांचे तसेच यामुळे निर्माण होणाऱ्या मानसिक परिस्थितीबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
                नागपूर सायक्रियाटीक असोसिएशन व सार्वजनिक आरोग्य विभाग, नागपूर मंडळ यांच्या संयुक्तपणे ‘डॉक्टर मला बोलायचं आहे’ हा अभिनव उपक्रम सुरु करण्यात आल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी दिली.
                कोरोनाच्या भितीमुळे मानसिक तणावाचा मुकाबला करण्यासाठी थेट मानसोपचार तज्ज्ञ आपल्या प्रश्नांना उत्तर देणार आहे. शहरातील नामवंत डॉक्टरांनी यासाठी आपला वेळ उपलब्ध करुन दिला आहे. नागरिकांनी त्यांच्या दिलेल्या वेळेवरच दूरध्वनीवर समुपदेशन व मार्गदर्शन करणार आहेत. नागरिकांनी तज्ज्ञ डॉक्टर यांना दिलेल्या वेळेतच दूरध्वनी करायचा आहे. सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत यासाठी प्रत्येक तासाला वेगवेगळे डॅाक्टर आपल्याला मार्गदर्शन व समुपदेशन करणार आहेत. नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी केले आहे.
                नागरिक उद्भवलेल्या तणावाशी कोरोनामुळे मुकाबला करु शकतात यासाठी विनामूल्य समुपदेशन व मार्गदर्शन मिळणार आहे. डॉक्टरांचे नाव व त्यांची वेळ, दूरध्वनी खालीलप्रमाणे आहेत.
अ.क्र. वेळ तज्ज्ञांचे नाव भ्रमणध्वनी क्रमांक

1 9 ते 10 डॉ. विवेक किरपेकर 9822200689
डॉ. अनघा सिन्हा 7387441630

2 10 ते 11 डॉ. निखिल पांडे 8087513627
डॉ. राहुल बागल 9158067162

3 12 ते 1 डॉ. रवी ढवळे 9960958582
डॉ. आनंद लाडे 9730448533

4 1 ते 2 डॉ. प्रितम चांडक 9766547119
डॉ. एन. जे. सावजी 9763207019

5 2 ते 3 डॉ. श्रेयस मागीया 7720067581
डॉ. राजीव पळसोदकर 9422125235

6 3 ते 4 डॉ. सुलेमान विरानी 9923228121
डॉ. श्रीकांत निंभोरकर 7499149612
डॉ. कुमार कांबळे 7558483467
डॉ. दुर्गा बंग 9422802530
डॉ. प्रवीर वऱ्हाडकर 9730818114

7 4 ते 5 डॉ. सागर चिद्दरवार 9657018165
डॉ. दीपक अवचट 7710915465
डॉ. आशिष कुथे 7972567721
डॉ. विकास भुते 7066044410
डॉ. राजश्री निंबाळकर 8806650227

8 5 ते 6 डॉ. अक्षय सरोदे 8698647469
डॉ. प्रिया मडावी 9834930944
डॉ. मोसम फिरके 8087253119
डॉ. पंकज बागडे 7057607517

9 6 ते 7 डॉ. प्रदीप पाटील 8999248979
डॉ. आभा बंग 0712-2426297
डॉ. दीपा सांगोलकर 8805101839
डॉ. अभिजीत फाये 9765266166

10 7 ते 8 डॉ. सुधिर भावे 9822695890
डॉ. साकीब 9657555644

11 8 ते 9 डॉ. राजेश राठी 9860486276
डॉ. सुशिल गावंडे 7350279564
डॉ. मनिषा दास 9325357152

****

प्रधानमंत्री जन धन योजनेची रक्कम महिला खातेधारकांच्या खात्यात जमा

·         ठराविक दिवशी काढता येणार रक्कम
·        खातेधारकांनी सोशल डिस्टन्सींगचे भान राखावे
·        बँकेत गर्दी करु नये
नागपूर दि. 01: प्रधानमंत्री जन धन योजनेत खाती उघडलेल्या सर्व महिला खातेदारांच्या खात्यांवर पुढील तीन महिने (एप्रिल, मे आणि जून 2020) प्रति महिना रुपये पाचशे इतकी रक्कम प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आयुक्त ए. एस. आर. नायक यांनी दिली आहे.                       
            यानुसार एप्रिल महिन्याची रक्कम 2 एप्रिल 2020 रोजी सर्व संबंधित बँकांकडे सरकारकडून वर्ग करण्यात येईल. सध्या सुरू असलेल्या कोविड-19 साथीमुळे बँक शाखांमध्ये आणि ग्राहक सेवा केंद्रांवर गर्दी होऊ नये म्हणून वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने पुढीलप्रमाणे दिवस आणि वेळापत्रक आखून दिले आहेत, असे श्री. नायक यांनी सांगितले.                          
             त्यामध्ये उद्या, शुक्रवार (3 एप्रिल) रोजी ज्या खाते क्रमांकांचा शेवट 0 किंवा 1 ने होतो त्या खातेधारकास त्याच्या खात्यांतील रक्कम काढता येईल. तर मंगळवार (4 एप्रिल) रोजी ज्या खाते क्रमांकांचा शेवट 2 किंवा 3 ने होतो त्या खातेधारकास त्याच्या खात्यांतील रक्कम काढता येईल. 5 तारखेला रविवार आणि 6 एप्रिल रोजी महावीर जयंतीची सुट्टी असल्यामुळे व्यवहार बंद राहतील.
            तर मंगळवार (7 एप्रिल) रोजी ज्या खाते क्रमांकांचा शेवट 4 किंवा 5 ने होतो त्या खातेधारकास त्याच्या खात्यांतील रक्कम काढता येईल. बुधवार (8 एप्रिल) रोजी ज्या खाते क्रमांकांचा शेवट 6 किंवा 7 ने होतो त्या खातेधारकास त्याच्या खात्यांतील रक्कम काढता येईल. आणि सर्वात शेवटी म्हणजे पाचव्या दिवशी गुरुवारी (9एप्रिल) रोजी ज्या खाते क्रमांकांचा शेवट 8 किंवा 9 ने होतो त्या खातेधारकास त्याच्या खात्यांतील रक्कम काढता येईल, असेही श्री. नायक यांनी सांगितले आहे.
*****