नागपूर, दि. 3 : अंधश्रद्धेने व व्यसनाने ग्रासलेल्या समाजाला यापासून परावृत्त करीत त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल घडविण्याचे कार्य जुमदेव महाराजानी केले. त्यांचा हा वारसा व्यसनमुक्ती अभियानाच्या माध्यमातून सामुहिक विवाह सोहळ्याची कार्यकारीणी चालवत आहे. ही बाब कौतुकास्पद असून यापुढेही तो चालूच राहणार असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
रामटेक येथे आयोजित व्यसनमुक्ती अभियान व सामूहिक विवाहा सोहळ्याच्या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी रामटेकचे आमदार डी. मल्लीकार्जुन रेड्डी, ज्येष्ठ समाजसेविका डॉ. राणी बंग, वस्त्रोद्योग मंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर उपस्थित होते.
याविषयी गरीब कुटुंबातील 23 जोडण्यांचा सामूहिक विवाह सोहळा पार पाडला. याप्रसंगी पालकमंत्री म्हणाले की, समाजातील गरीब, वंचित, अंध, अपंग, विधवा, घटस्फोटीत यासारख्या दुर्लक्षित घटकांच्या हितासाठी संस्थेद्वारे उत्तम कार्य होत असल्याचे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले. यावेळी बोलतांना त्यांनी सांगितले की, तळागाळातील लोकांच्या समस्या तसेच गरीब, वंचित, अपंग, विधवा यांच्या समस्या दूर करण्यासाठी व त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनामार्फत अनेक योजना राबविण्यात येत आहेत. या योजना गरजू व्यक्तीपर्यंत पोहचविणे शासनाचे कार्य असून त्यासोबतच समाजाचे तेवढाच सहभाग आवश्यक आहे.
जुमदेवजी आनंदधाम संस्थेद्वारे सामाजिक कार्य करण्यात येत आहे. व्यसनमुक्ती, दारुमुक्ती, अंधश्रद्धा निर्मुलन इत्यादीबाबत सामाजिक जागृती करण्याच्या इतर संस्थासाठी राज्यपातळीवर पुरस्कार देवून त्यांचा गौरव करण्याचा उपक्रम शासनाच्या विचाराधीन असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
*****

No comments:
Post a Comment