Friday, 7 April 2017

कुस्ती, तायक्वांदो, नेमबाजीतील मुलांकरिता नाशिक येथे खुली भरती


नागपूर, दि.06 :   नाशिक रोड येथे आर्टिलरी सेंटर येथे कुस्ती, तायक्वांदो व नेमबाजी या खेळात जिल्हास्तरावर प्राविण्य मिळविलेल्या मुलांकरिता 10 एप्रिल रोजी खुली भरती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन डॉ. दिपक लिमसे यांनी दिली.
कुस्ती, तायक्वांदो व नेमबाजी या खेळात जिल्हास्तरावर प्राविण्य मिळविलेल्या 11 ते 14 वयोगटातील मुलांसाठी नाशिक रोड येथे बॉईज स्पोर्टस कंपनी आर्टिलरी सेंटर येथे भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी संपूर्ण मुळ कागदपत्रासह दिनांक 10 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता उपस्थित राहयचे आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना निवास, भोजन, शिक्षण आदि सुविधा मोफत पुरविल्या जाणार आहेत. यासाठी कमांडिंग ऑफिसर बाईज स्पोर्टस कंपनी आर्टिलरी सेंटर यांचा दूरध्वनी क्रमांक 0253-2412523 व 2410723 (विस्तार 6098 व 6080) यावर संपर्क करावा. अधिक माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे उपलब्ध आहे.

0000000

No comments:

Post a Comment