Wednesday, 5 April 2017

आदर्श जीवन जगण्याचा संकल्प करु या -- देवेंद्र फडणवीस




  • श्रीराम जन्मोत्सवानिमित्त अभूतपूर्व शोभायात्रा
  • पोद्दारेश्वर राम मंदिर येथे 51 व्या जन्मोत्सव यात्रेचा शुभारंभ
  • राज्यपालांसह विविध मान्यवरांची उपस्थिती
  • रामायणातील विविध प्रसंगावर आधारित 77 झाकियाँ
  • लाखो भक्तांची उपस्थिती, रामनामाचा जयघोष

नागपूर, दि. 4 :   प्रभू रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम होते. देशाच्या संस्कृतीमध्ये त्यांचा आदर्श  सर्वांनी घेतला आहे. श्रीरामाने मर्यादा पुरुषोत्तम म्हणून आम्हाला आदर्श जीवन दिले. त्या जीवनाकडे जाण्याचा संकल्प सर्वांनी मिळून करु या. अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामनवमीनिमित्त आयोजित शोभायात्रेच्या शुभारंभाप्रसंगी  शुभेच्छा दिल्यात.
पोद्दारेश्वर राम मंदिरातर्फे 51 व्या श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीरामाचे दर्शन घेवून नागपूर येथील ऐतिहासिक व पारंपरिक अशा शोभायात्रेस मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला. यावेळी  आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, राज्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर श्रीमती नंदाताई जिचकार, आमदार प्रा. अनिल सोले, कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, मिलिंद माने, उपमहापौर दीपराज पार्डीकर, संदीप जाधव, शरद जिचकार आदींनी  श्रीरामाचे दर्शन घेतले. त्यानंतर विधिवत शोभायात्रेला सुरुवात झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सजवलेल्या रथावर प्रभू श्रीरामचंद्र, सीतामाई, लक्ष्मण तसेच वीर हनुमानाच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर रथावर आरुढ झालेल्या प्रभू रामचंद्राच्या रथाला सुरुवात झाली. त्यानंतर श्रीरामनवमीच्या जनतेला शुभेच्छा देतांना मुख्यमंत्री म्हणाले की, नागपूर येथील प्रभू रामचंद्र जन्मोत्सवाची  शोभायात्रा अभूतपूर्व असून या शोभायात्रेमध्ये सर्व धर्म, पंथ, भाषा बोलणारे एकत्र येवून राम जन्मोत्सव साजरा करतात.
प्रभू श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम होते. देशाच्या संस्कृतीमध्ये त्यांचा आदर्श संपूर्ण जगाने घेतला आहे. श्रीरामाने मर्यादा पुरुषोत्तम म्हणून आम्हाला आदर्श जीवन दिले. त्यानुसार जीवनाकडे जाण्याचा संकल्प सर्वजण करतात. देशाला पुढे नेण्याचा संकल्प प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी सर्वमिळून कटिबद्ध होवू या. असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  केले.

श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा ही नागपूरच्या इतिहासातील एक वैशिष्ट्यपूर्ण आहे. शोभायात्रेचा शुभारंभ प्रभू रामचंद्राचा मुख्य रथ, शक्ती रथावर आरुढ प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेचे पूजन  श्री. श्यामसुंदरजी पोद्दार यांच्या हस्ते करण्यात आले. या संपूर्ण रथाची सजावट हरिकिशनजी अग्रवाल परिवारातर्फे करण्यात आली. हा रथ भगवान जगन्नाथ यांच्या रथाप्रमाणे भाविक ओढत संपूर्ण नागपूर शहरातून रथ यात्रा काढली जाते.
यावेळी महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे माजी मंत्री रमेश बंग, माजी आमदार दिनानाथ पडोळे, जयप्रकाश गुप्ता, सुरेश शर्मा, दयाशंकर तिवारी, संजय बालपांडे, श्रीमती सरला नायक, श्रीमती विद्या कन्हेरे, प्रवीण दटके, संदीप जोशी, संदीप जाधव, संजय महाकाळकर तसेच विरेंद्रजी कुकरेजा, ओमप्रकाश अग्रवाल, सुरेश जैस्वाल, पुष्करलाल अग्रवाल, गोधारामजी तारवानी, ॲड. प्रकाश जैस्वाल आदी यावेळी उपस्थित होते.
श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रेत प्रभू रामचंद्राच्या जीवनावर आधारित तसेच श्रीगणेश, श्री हनुमान, अश्वमेघ यज्ञ, श्री शिवाजी आदी 77 झाकियाँ तसेच आदिवासी नृत्य, लेझिम पथक, महिला भजन मंडळ आदी विविध संस्था, उद्योजक व आदी व्यक्तींच्या झाकियाँ शोभायात्रेत  सहभागी झाल्या आहेत.
*****

No comments:

Post a Comment