Wednesday, 5 April 2017

प्रभू रामचंद्राची शिकवण सर्वांनी अंगिकारावी -- देवेंद्र फडणवीस



  • रामनगर येथे श्रीराम जन्मोत्सवानिमित्त शोभायात्रेचे आयोजन
  • ज्यपालांसह विविध मान्यवरांची उपस्थिती
  • मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शोभायात्रा पालखीचे पूजन
  • हजारो भक्तांची उपस्थिती, रामनामाचा जयघोष


नागपूर, दि. 4 : प्रभू रामचंद्रांच्या शिकवणीचा आपल्या जीवनात सर्वांनी अंगिकार करावा अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामनवमीनिमित्त दक्षिण-पश्चिम नागपूर येथील रामनगर येथे आयोजित शोभायात्रेच्या शुभारंभाप्रसंगी  जनतेला शुभेच्या दिल्यात.
रामनगर  येथील राममंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीरामाचे दर्शन घेवून पालखीचे पूजन केले. यावेळी सर्व उपस्थितांच्या हस्ते प्रभू रामचंद्राची आरती करण्यात आली.
यावेळी आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अजय संचेती, खासदार कृपाल तुमाने, महापौर नंदाताई जिचकार, आमदार सुधाकर देशमुख, आमदार परिणय फुके, संस्थेचे अध्यक्ष जयंत आपटे, सचिव राजीव काळेले, रवी वाघमारे, प्रवीण महाजन, शंतुनी मुळी, अनिरुद्ध फालकर, अशोक बागुलपोटे, वसंतलाल शहा उपस्थित होते.
मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस व आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी सजवलेल्या रथावर प्रभू श्रीरामचंद्र, सीतामाई, लक्ष्मण तसेच वीर हनुमानाच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण केला. त्यांनतर रथावर आरुढ झालेल्या प्रभू रामचंद्राच्या रथाला सुरुवात झाली.
यावेळी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी शोभायात्रे प्रसंगी आयोजित जलजागृती प्रदर्शनीची  पहाणी केली.
यावेळी, लेझिम पथक, भजन मंडळ आदी विविध संस्था, उद्योजक व आदी व्यक्तींच्या झाकियाँ शोभायात्रेत  सहभागी झाल्या होत्या.
*******

No comments:

Post a Comment