Wednesday, 5 April 2017

लोकशाही दिनातील प्रलंबित तक्रारींचा तात्काळ निपटारा करा - सचिन कुर्वे


विविध विभागांकडे 184 तक्रारी प्रलंबित
लोकशाही दिनात 20 तक्रारी दाखल

नागपूर, दि.01 :  जिल्हास्तरीय लोकशाही दिनात जनतेकडून दाखल होणाऱ्या तक्रारी संदर्भात एक महिन्यात निर्णय घेवून केलेल्या कार्यवाहीबाबत तक्रारदारांना कळविणे बंधनकारक आहे. विविध विभाग प्रमुखांकडे प्रलंबित असलेल्या 184 तक्रारीवर तात्काळ निर्णय घेवून तक्रारदाराला केलेल्या कार्यवाहीबद्दल अवगत करा, अशा सूचना जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी आज दिल्यात.
जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन छत्रपती सभागृहात करण्यात आले होते. यावेळी जिल्हयातील नागरीकांनी आपली गऱ्हाणी व तक्रारी लोकशाही दिनात मांडली. निवासी उपजिल्हाधिकारी के.एन.के. राव यांनी तक्रारदारांचे म्हणने ऐकून घेवून संबंधित विभागांकडे पुढील कार्यवाहीसाठी तक्रारी सोपविल्या. आजच्या लोकशाही दिनात 20 तक्रारी दाखल झाल्या आहेत.
भूमिअभिलेख, महसूल, तसेच सहकारी विभागा संदर्भात सर्वाधिक तक्रारी आजच्या लोकशाही दिनात द दाखल झाल्यात. यावेळी सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
प्रलंबित तक्रारी तात्काळ सोडवा
लोकशाही दिनात दाखल झालेल्या तक्रारी संदर्भात एक महिन्यात निर्णय घेवून तक्रारदाराला केलेल्या कार्यवाहीबद्दल कळविण्याची सूचना जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केली. प्रलंबित असलेल्या 184 तक्रारीपैकी सार्वाधिक तक्रारी भूमिअभिलेख, तसेच महसूल, शिक्षण, नगर प्रशासन, सहकार, नागपूर पाटबंधारे विभाग, आदी विभागाचे संबंधित आहेत. या तक्रारी संदर्भात चौकशी करुन संबंधित तक्रारदाराला केलेल्या कार्यवाहीबद्दल लेखी स्वरुपात कळविण्यात यावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
0000000

No comments:

Post a Comment