Saturday, 1 April 2017

मध्यस्थी’ जनजागृती काळाची गरज -- न्या. के. जी. गांधी

* मध्यस्थी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
नागपूर, दि. 1 : सामोपचाराने व नि:पक्षपातीपणे  मध्यस्थाच्या माध्यमातून तंटे सोडविता येतात.  मध्यस्थी पद्धत ही पक्षकारांमधील तंटा परस्पर संमतीने सोडविणारी यशस्वी पद्धत आहे. याबाबत समाजामध्ये जागृती निर्माण होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्रमुख व सत्र जिल्हा न्यायाधीश के. जी.गांधी यांनी केले.
जिल्हा मध्यस्थी केंद्र व जिल्हा बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मध्यस्थी जनजागृती कार्यक्रम’ जिल्हा न्यायालय येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
व्यासपिठावर न्यायाधिश व ‘ट्रेन्ड जज मेडीएटर’ एस.एस.दास, न्यायाधिश व ‘ट्रेन्ड जज मेडीएटर’ एस.    टी. भालेराव, न्यायाधिश व ‘ट्रेन्ड जज मेडीयेटर’ ए. के. शर्मा, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणचे सचिव कुणाल  जाधव तसेच जिल्हा बार असोशिएशनचे सचिव नितीन तेलगोटे उपस्थित होते.
मध्यस्थी ही जीवनप्रक्रिया आहे. यामुळे जीवनाकडे  बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. मध्यस्थी पद्धतीव्दारे लोकांचे मनपरिवर्तन होऊन वाद मिटण्यासाठी मदत होते. यामुळे लोकांवर न्याय लादला जात नाही. स्वत: न्याय प्राप्त करुन घेता येतो. याकरीता मध्यस्थी जनजागृती कार्यक्रम महत्वाचा असल्याचे न्यायाधिश व ट्रेन्ड जज मेडीएटर एस. टी. भालेराव यांनी बेसिक ऑफ मेडीएशन इट्स नेसेसिटी ॲन्ड बेनेफिट्स या विषयावर बोलतांना सांगीतले.
यावेळी न्यायाधीश एस.एस.दास व न्यायाधीश ए. के. शर्मा यांची भाषणे झाली.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणच्या सदस्या ॲङ सुरेखा बोरकुटे   यांनी केले. यावेळी वकील, पक्षकार, लॉ कॉलेजचे विद्यार्थी, विधी स्वयंसेवक तसेच सरकारी वकील उपस्थित होते.
*****

No comments:

Post a Comment