मुंबई, दि. 27 : 'पर्यावरण आणि हवामान साक्षरता' या विषयाच्या अनुषंगाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित' दिलखुलास' या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ.पी.अन्बलगन यांची मुलाखत घेण्यात आली आहे.
या मुलाखतीत पर्यावरण विषयक प्रश्न आणि शासन करत असलेल्या उपाययोजना या विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून शुक्रवार दि. 28 व 29 एप्रिल 2017 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत हेमंत बर्वे यांनी घेतली आहे.
००००
No comments:
Post a Comment