Thursday, 27 July 2017

घाटकोपर दुर्घटनेतील रहिवाशांनी घेतली मुख्यमंत्री यांची भेट

मुंबईदि. 27 घाटकोपर येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीमधील रहिवासी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज विधान भवन येथे भेट घेतली. यावेळी गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता आमदार राम कदम उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणालेया दुर्घटनाग्रस्त इमारतीतील रहिवाशांना सर्व मूलभूत सुविधा असलेली तात्पुरती जागा उपलब्ध करून देण्यात येईल. येथील रहिवाशांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल.
कोसळलेली इमारत होती त्याच ठिकाणी कायमस्वरूपी व्यवस्था व्हावीतात्पुरता निवारा उपलब्ध करून द्यावादोषींवर कडक कारवाई करावी आशा विविध मागण्या दुर्घटनाग्रस्त इमारतीतील रहिवाशांनी केल्या.
००००

No comments:

Post a Comment