Friday, 17 November 2017

रस्ते खड्डेमुक्त्त करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत कालबद्ध कार्यक्रम तयार करा -चंद्रशेखर बावनकुळे

* शहर व जिल्ह्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याबाबत आढावा
* प्रत्येक रस्त्यांची तपासणी करुन आराखडा
* कार्यकारी अभियंत्यावर जबाबदारी निश्चित करणार
* ग्रामीण भागातील रस्ते 15 डिसेंबर पर्यंत पूर्ण करा

        नागपूर, दि. 17 : जिल्ह्यातील सर्व रस्त्यांवर असणारे खड्डे बुजविण्यासाठी विधानसभा मतदार संघनिहाय आराखडा तयार करुन शहरातील रस्त्यांवरील खड्डे 30 नोव्हेंबरपर्यंत तर ग्रामीण भागातील 15 डिसेंबरपर्यंत खड्डे बुजवून नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध करुन  द्या, अशी सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी  दिल्यात.
            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचतभवन सभागृहात खड्डेमुक्त रस्ते या विषयावर विविध विभागांचा आढावा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी  दिल्यात.
            यावेळी आमदार समीर मेघे, आमदार मल्लीकार्जून रेड्डी, आमदार सुधाकर देशमुख,  जिल्हा परिषद सभापती निशा सावरकर, नागपूर महानगरपालिका आयुक्त अश्विन मुद्गल, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे सह संबंधित विभागाचे अभियंता, उपअभियंता उपस्थित होते.
            नागपूर शहरातील विविध रस्त्यांवर असलेल्या खड्यांमुळे जनतेला त्रास होणार नाही, यादृष्टीने विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येक रस्त्यांची  पाहणी करुन येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण खड्डे बुजविण्याचा कार्यक्रम तयार करा तसेच ग्रामीण भागातील रस्तेही 15 डिसेंबरपर्यंत पूर्ण करा असे निर्देश देताना पालकमंत्री म्हणाले की, शहरातील रस्त्यांवर 8 ते 10 हजार खड्डे असून यासाठी कालबद्ध कार्यक्रमानुसार अंमलबजावणी करावी, यासाठी  कार्यकारी अभियंता व संबंधित उप अभियंत्यांवर जबाबदारी निश्चित करावी, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.
            ग्रामीण भागातील रस्त्यावर असलेल्या खड्यांमुळे वाहतूकीला अडथळा निर्माण होत असून या मार्गावरील खड्डे बुजविण्यात यावे. विशेषत:  तारसा- निमखेडा, कन्हान- तारसा, कान्हान- निमखेडा मार्गावर सतत वर्दळ सुरू त्वरित दखल घेऊन खड्डे बुजविण्यात यावे. तसेच नॅशनल हायवेवरील 167 किलोमीटरचा रस्ता दुरूस्त करा. या व्यतीरिक्त काटोल, रामटेक, नरखेड, उमरेड- कुही , कामठी या विधानसभा मतदारसंघनिहाय खड्डे असलेल्या रस्त्यांचा अहवाल तयार करुन रस्ते दुरूस्ती करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. तसेच जिल्ह्यातील विविध 50 रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे असून अपघाताला आव्हान दिल्या जात असल्याने या मार्गावरील खड्डे बुजविण्याकरिता नियोजन करण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अभियंतांना बैठकीत देण्यात आल्या.
*****


No comments:

Post a Comment