- नगरभूमापन विभागाच्या शिबिरामध्ये 500 प्रकरणे दाखल
नागपूर, दि.06 : नगरभूमापन कार्यालयाशी संबंधित असलेल्या नामांतरण प्रकरणात असलेल्या त्रुट्यांची पूर्तता तसेच नामांतरणासाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष शिबिरात 500 प्रकरणे दाखल झाली असून, त्यापैकी 375 प्रकरणांना मंजूरी देण्यात येऊन नामांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली.
नामांतरण प्रकरणात मौजानिहाय प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा तात्काळ निपटारा करण्यासाठी नगरभूमापन अधिकारी क्रमांक 2 व 3 या कार्यालयातर्फे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून भूखंड व इतर स्थावर मालमत्तेच्या नामांतरणा संदर्भात अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
नगरभूमापन अधिकारी क्रमांक 2 व 3 या कार्यालयाशी संबंधित असलेल्या सर्व नामांतरण प्रकरणांचा त्यात समावेश होता. विशेष गाव व झोननिहाय आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात 490 च्या जवळपास त्रुट्या पूर्तता झालेली प्रकरणे दाखल करण्यात आली. यापैकी 375 प्रकरणांना मंजूरी देऊन प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. असल्याची जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली.
नागरिकांना नामांतरण प्रकरणात त्रुटी आढळल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावा लागतो. त्यात नागरिकांचा वेळ आणि श्रम वाया जातात. नागरिकांना होणाऱ्या या त्रासाची दखल घेऊन तसेच वेळेची बचत करण्याच्या दृष्टीने नामांतरण प्रकरणातील त्रुटींचा तात्काळ निपटारा करण्याकरिता विशेष शिबिराचे आयोजन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी पुढाकारा घेऊन आयोजित केले.
जिल्हयातील मालमत्तेच्या हस्तांतरणाचे व्यवहार दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात नोंदविल्यानंतर नगरभूमापन कार्यालयात नामांतरणासाठी पाठविण्यात येते. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून सेतू केंद्रात ही प्रकरणे संकलित केल्या जातात. परंतु अशा प्रकरणात त्रुटया असल्यास नामांतरणाची कार्यवाही पूर्ण होत नाही. त्यामुळे नगरभूमापन अधिकारी क्रमांक 2 व 3 या कार्यालयाशी संबंधित असलेल्या सर्व प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
नगरभूमापन अधिकारी क्रमांक 2 कार्यालयातंर्गत येणाऱ्या वडपाकड, हंसापुरी, भानखेडा, नारा, नारी, इंदोरा, चिखली देव, कळमना, वांजरा, बिनाकी, दिघोरी, हरपूर, वाठोडा, हिवरी, भांडेवाडी, पुनापूर, भरतवाडा, पारडी, बाबुलखेडा, मानेवाडा, सक्करदरा, चिखली खुर्द, बिडीपेठ येथील तक्रारींचा समावेश आहे. कार्यालयाकडून त्रुट्या पूर्तता झालेली 67 प्रकरणे व नवीन प्राप्त झालेली 297 प्रकरणे असे 364 प्रकरणे प्राप्त झाली. यापैकी 281 प्रकरण मंजूर करण्यात आले तर, 83 प्रकरणांमध्ये त्रुट्या काढण्यात आल्या.
नगरभूमापन अधिकारी क्रमांक 3 कार्यालयातंर्गत येणाऱ्या बोरगांव, दाभा, गोरेवाडा, मानकापूर, जरीपटका, पोलीस लाईन टाकळी, खामला, भामटी, परसोडी, टाकळी सिम, चिचभूवन, सोनेगाव, लेन्ड्रा, अंबाझरी, जयताळा, अजनी, सोमलवाडा, सिताबर्डी, जाटतरोडी, धंतोली, गाडगा, झिंगाबाई टाकळी, हजारी पहाड येथील नागरिकांच्या तक्रारी शिबिरात स्वीकारण्यात आल्या. शिबिरात नवीन प्राप्त झालेली 126 प्रकरणे आहेत. यापैकी 94 प्रकरण मंजूर करण्यात आले तर, 32 प्रकरणांमध्ये त्रुट्या काढण्यात आल्या.
जनतेच्या बोलक्या प्रतिक्रिया
नामांतरण शिबिरात विविध मौजांमधील नागरिकांच्या वेळेची बचत झाली. सोबतच प्रकाणातील त्रुटी तात्काळ निकाली निघाल्याने तक्रारकर्ता नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. असून, या संदर्भात नागरिकांच्या बोलक्या प्रतिक्रिया
Ø नामांतरण शिबिराच्या माध्यमातून अनेक वर्षापासूनचे प्रकरण त्वरित निकाली निघाले. जिल्हाधिकारी कार्यालयाचा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. ग्रामीण भागातील नागरिकांकरिता वर्षातून एकदा असा उपक्रम राबविण्यात यावा.
आशू गाडे
Ø जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात आलेल्या उपक्रमामुळे नामांतरण प्रकरण निकाली काढण्याकरिता लागणारा वेळ आणि श्रमाची बचत झाली. शिबिरात नाव नोंदणी सहज करता आली. नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने असे शिबिराचे आयोजन नेहमी करण्यात यावे. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी घेतलेल्या पुढकाराने वेळ आणि श्रमाची बचत झाली.
अजय पुंडलिक
Ø नामांतरण शिबिरात योग्य मार्गदर्शन मिळाले. तसेच शंकांचे निराकरण होवून कमी वेळात तक्रारींचा निपटारा झाला. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत असे उपक्रम नेहमीच राबविण्यात यावे.
मिलिंद जोशी
Ø नामांतरण शिबिराच्या माध्यमातून अडचणी असलेल्या प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचण्याचा चांगला उपक्रम आहे. शिबिरामुळे वेळ आणि श्रमाची बचत झाली आहे. त्याबद्दल सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभारी आहे.
डॉ. उल्हास नंदनकर
******
No comments:
Post a Comment