नागपूर दि. 06 : नागपूर जिल्हा (ग्रामिण) करिता विविध अटी व शर्तींच्या अधीन राहून तीन चाकी ऑटोरिक्षा व टॅक्सी परवान्याचे वाटप करणे सुरु करण्यात आले आहे.
तीन चाकी ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक, मालकांनी खाजगी संवर्गातील नोंदणी असणारी ऑटोरिक्षा नवीन परवान्यावर परिवहन संवर्गात नोंदणी करतांना अथवा सध्याच्या परवान्यावर बदली वाहन म्हणून परिवहन संवर्गात नोंदणी करताना शासनाने विहित केलेले अतिरिक्त परवाना शुल्क अदा करुन अशी खाजगी संवर्गातील नोंदणी झालेली ॲटोरिक्षा परिवहन संवर्गात दिनांक 31 मार्च 2018 पर्यंत नोंदणी करुन घेण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीपाद वाडकर यांनी प्रसिदधीपत्रकाद्वारे केले आहे.
*****
No comments:
Post a Comment