Monday, 13 November 2017

चैत्यभूमी परिसरात देण्यात येणाऱ्या सुविधांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांना चांगल्या सुविधा द्या - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



मुंबईदि. 13 : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे सेवा सुविधा देण्यासाठी सर्व विभागांनी नियोजन करून अनुयायांना चांगल्या सेवा द्याव्यातअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच या काळात इंदू मिल येथील स्मारकाच्या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा आराखडा मांडण्यात यावाअशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी चैत्यभूमी येथे पुरविण्यात येणाऱ्या सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक झाली.
            मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांना चांगल्या सेवा देण्यात याव्यात. या काळात बाहेरून येणाऱ्या अनुयायांसाठी रेल्वेने विशेष व्यवस्था करावीयासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल. शिवाजी पार्क परिसरात बार्टीमार्फत अल्पोपहार व भोजनाची सोय यंदाही करण्यात येणार आहे. या काळात या परिसरात स्वच्छता रहावी यासाठी प्रयत्न करावेत.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त यंदाही माहिती व जनसंपर्क महासंचालनायाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील चित्रपट दाखवण्यात येणार आहे. तसेच दूरचित्रवाहिनीवृत्तपत्रे व आकाशवाणी या माध्यमांतून संदेशपर जाहिराती प्रसिद्ध करणेजय महाराष्ट्र व दिलखुलास या कार्यक्रमात विशेष प्रसारण करणेजिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी बॅनर लावणे आदींचे नियोजन करण्यात आल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले. चैत्यभूमी येथे येणारे अनुयायी हे इंदूमिल येथील स्मारकाच्या जागेलाही भेट देतात. त्यामुळे तेथेही सर्व सोयी सुविधा पुरविण्यात येणार आहेत. तसेच स्मारकाची प्रतिकृती ठेवण्यास एमएमआरडीएला सांगण्यात आले आहे.
तसेच स्मारकाच्या कामाचे कार्यारंभ आदेश तातडीने देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केली.
बोरिवली येथील पॅगोडा येथे भेट देणाऱ्यासाठी विशेष बस व्यवस्था करण्यात येणार आहेअसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी नागसेन कांबळे यांनी समन्वय समितीच्या मागण्या सादर केल्या. समितीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या सूचना पत्रिका व माहिती पुस्तिकेचे अनावरण मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते यावेळी झाले.
यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळेगृह राज्यमंत्री दीपक केसरकरआमदार राज पुरोहितगृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव,नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकरपोलिस महासंचालक सतीश माथूरबृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहताएमएमआरडीएचे सहआयुक्त प्रवीण दराडेकोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांच्यासह डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळेउपाध्यक्ष महेंद्र साळवेरवी गरुडभदंत करुणानिधी थेरो यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
००००

No comments:

Post a Comment