मुंबई, दि. १३ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दि. १४ नोव्हेंबर सायंकाळी ७.३० वा. प्रसारित होणार आहे. ही मुलाखत रुपलक्ष्मी चैागुले - शिंदे यांनी घेतली आहे.
महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राचा शाश्वत विकास करण्यासाठी राज्य शासनाने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. गेल्या तीन वर्षात राज्यातील कृषी क्षेत्रात झालेले बदल, राज्यातील शेती आणि शेतकरी विकासासाठी शासनाने सुरू केलेल्या योजना, उपक्रम आदीं विषयांची सविस्तर माहिती श्री. खोत यांनी जय महाराष्ट्र कार्यक्रमातून दिली आहे.
००००

No comments:
Post a Comment