Wednesday, 15 November 2017

'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा


          मुंबई, दि. १५ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात 'आदिवासी विकास विभागाची वाटचालया विषयावर आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांची मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार, दि. १७ नोव्हेंबर रोजी प्रसारित होणार आहे. निवेदक विजय गायकवाड यांनी ही मुलाखत घेतली आहे.
आश्रमशाळांच्या बळकटीकरणा करिता सुरू केलेले कायापालट अभियानजीवन कौशल्य प्रशिक्षणडॉ.अब्दुल कलाम अमृत आहार योजनाआश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी थेट लाभ हस्तांतरण योजना (डीबीटी)आश्रमशाळांमधील शाळा व्यवस्थापन समितीचे कामकाजपेसा कायद्यांर्तगत अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना गाव व पाड्यांचा विकास आदी योजना व उपक्रमांविषयीची सविस्तर माहिती 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातून विष्णू सवरा यांनी दिली आहे.
००००

No comments:

Post a Comment