मुंबई, दि.१५ : पालघर जिल्ह्यातील वसई येथे शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समितीत मार्केट यार्ड उभारणी करणे आवश्यक आहे. मार्केट यार्ड उभारणीसाठी जागा खरेदीचा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक यांच्यामार्फत शासनाकडे पाठवावा, असे निर्देश पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज दिले.
वसई बाजार समिती स्थापने संदर्भात मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. श्री.देशमुख म्हणाले, वसई येथे बाजार समिती आवारात मार्केट यार्ड उभारणी आवश्यक असून शासनाकडून त्यासाठी त्वरित कार्यवाही करण्यात येईल. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी बाजार समितीकडे असलेल्या ठेवीतून शक्य असलेल्या जागा खरेदीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा,असे निर्देश श्री. देशमुख यांनी दिले.
पणन मंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला, पणन विभागाचे अधिकारी, वसई-विरार मनपाचे प्रतिनिधी, कृषी उत्पन्न बाजार समिती वसईचे पदाधिकारी उपस्थित होते.
००००
No comments:
Post a Comment