नागपूर, दि.15 : कंत्राटी कामगार अधिनियम
अंतर्गत ऑनलाइन प्रक्रियेद्वारा मुख्य मालक म्हणून नोंदणी केलेल्या तसेच
अनुज्ञप्तीधारक कंत्राटदारांनी आपल्या युजर अकाऊंटमध्ये ‘Consolidated Annual Return’
या लिंकद्वारे माहे एप्रिल 2017 पर्यंतचे एकत्रित वार्षिक विवरण
ऑनलाइनद्वारा सादर करावे. कामगार विभागाच्या Ims.mahaonline.gov.com या संकेतस्थळावर नोंदणी प्रमाणपत्र, अनुज्ञप्ती निर्गमित करण्यात आले आहे.
मुख्य मालक आस्थापना तसेच कंत्राटदारांनी ऑनलाइन पध्दतीने एकत्रित वार्षिक विवरण
त्वरीत सादर करण्याचे आवाहन अपर कामगार आयुक्त यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
******
No comments:
Post a Comment