नागपूर, दि.15 : भारतीय प्रेस परिषदेच्या
सुवर्ण जयंती वर्षानिमित्त राष्ट्रीय प्रेस दिन साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी
माध्यमा समोरील आव्हाने हा विषय असून या अनुषंगाने गुरुवार, 16 नोव्हेंबर 2017 रोजी
नागपूर श्रमिक पत्रकार संघ व माहिती व जनसंपर्क विभागातर्फे प्रेस क्लब येथे
राष्ट्रीय प्रेस दिनाचे दुपारी 4 वाजता आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय प्रेस दिनानिमित्त ज्येष्ठ
संपादक व विचारवंत मा. गो. वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीत माध्यमा समोरील आव्हाने
या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख वक्ते
म्हणून हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड अनिल किलोर, भारतीय प्रेस परिषदेचे सदस्य
तथा समुह संपादक प्रकाश दुबे, श्रीपाद अपराजित आदी मार्गदर्शन करणार आहे.
राष्ट्रीय प्रेस दिनानिमित्त आयोजित
पत्रकार प्रेस क्लब, शासकीय विज्ञान महाविद्यालयासमोर सिव्हील लाईन येथे दुपारी 4
वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन नागपूर श्रमिक पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप
मैत्र तसेच माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक राधाकृष्ण मुळी यांनी केले आहे.
000000000
No comments:
Post a Comment