Saturday, 11 November 2017

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा आराखडा तयार करावा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस




नागपूर, दि. 11 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक पटवर्धन ग्राऊंड येथे व्हावे, यासाठी वाढीव जागेच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे.  या स्मारकासंदर्भात आराखडा तयार करा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्या.
            रामगिरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीची बैठक  झाली यावेळी ते बोलत होते.
            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम चांगल्या पद्धतीने होईल. या स्मारकाच्या बांधकामासंदर्भातील आराखडा संबंधित यंत्रणांनी लवकरात लवकर तयार करावा,  अशा सूचनाही  यावेळी त्यांनी दिल्या.
            यावेळी माजी महापौर प्रवीण दटके, पक्षनेता संदीप जोशी, स्थायी समितीचे सभापती         संदीप जाधव, बहुजन समाज पक्षाचे अध्यक्ष महंमद जमाल, महेश नागपुरे  तसेच नगरसेवक उपस्थित होते.
           

*****   

No comments:

Post a Comment