मुंबई, दि. 10 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्याचा विकास या विषयावर महसूल तथा कोल्हापूर पालकमंत्री चंद्रकात पाटील यांची मुलाखत आकाशवाणीवरून सोमवार, दि. १३ आणि मंगळवार दि. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत मनाली दीक्षित यांनी घेतली आहे.
स्वच्छता अभियानात कोल्हापूर जिल्ह्याने घेतलेली आघाडी, जलयुक्त शिवार अभियान, मुद्रा योजनेचा घेतलेला लाभ, पर्यटनातून रोजगार निर्मिती करण्यासाठी तीर्थक्षेत्राचा केलेला विकास तसेच महाराजस्व अभियान आदी विषयांवरची माहिती श्री. पाटील यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे.
००००

No comments:
Post a Comment