मुंबई,दि.4 : भारत दौऱ्यावर आलेले
लॅटव्हिया देशाचे पंतप्रधान मॉरीस कुसिन्स्कीस यांनी आज उच्चस्तरीय शिष्टमंडळासह
राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
यावेळी महाराष्ट्र तसेच लॅटव्हिया
देशातील शैक्षणिक, औद्योगिक तसेच सांस्कृतिक संबंध अधिक
दृढ व्हावे, यासाठी समन्वय वाढविण्यात यावा या संदर्भात चर्चा करण्यात आली.
लॅटव्हियाचे भारतातील राजदूतॲव्हरॉस
ग्रोझा, लॅटव्हियातील भारताच्या राजदूत मोनिका कपील
मोहता, तसेच लॅटव्हिया व भारतातील वरिष्ठ अधिकारी यावेळी
उपस्थित होते.
००००



No comments:
Post a Comment