नागपूर, दि.08 : बॅडमिंटन खेळासाठी तसेच बॅडमिंटन स्पर्धांच्या आयोजनासाठी शासन नेहमीच प्रोत्साहन देत राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात 82 व्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी भारतीय बॅडमिंटन महासंघाचे अध्यक्ष डॉ. हिमंता सरमा, महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष अरुण लखानी, विजय दर्डा, बॅडमिंटन प्रशिक्षक पी. गोपीचंद, मंगेश काशीकर तसेच बॅडमिंटन क्षेत्रातील प्रशिक्षक व अन्य मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन नागपूर येथे करण्यात आले. ही नागपूरकरांसाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने देशातील नामांकीत खेळाडूंचा दर्जेदार खेळ नागपूरच्या रसिकांना अनुभवास मिळाला, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.
भारतीय बॅडमिंटन महासंघाचे अध्यक्ष डॉ. हिमंता सरमा यांनी नागपुरातील बॅडमिंटनच्या राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन उत्कृष्ट करण्यात आल्याचे सांगून विशेष कौतुक केले.
महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष अरुण लखानी म्हणाले, नागपूर येथे राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांच्या आयोजनासाठी शहरातील विविध घटकांनी उत्कृष्ट सहकार्य केले.
देशातील दोन दिग्गज महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांच्यात चुरशीचा सामना झाला. नागपूरकर क्रीडा रसिकांनीही या सामन्याला भरभरुन दाद दिली. यामध्ये सायना नेहवाल सरस ठरली. स्पर्धेतील विजेत्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
No comments:
Post a Comment