Wednesday, 8 November 2017

डब्ल्यूटीएम लंडन २०१७ मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने केले पर्यटकांना आकर्षित

मुंबई, दि. 8 : लंडनमधील डब्ल्यूटीएम 2017मध्ये सहभागी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने परदेशी पर्यटकांना आकर्षित केले.
लंडन येथे ६ ते  नोव्हेंबर २०१७ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केट २०१७ या कार्यक्रमात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) सहभाग घेतला. महाराष्ट्राचे वैविध्य जागतिक पातळीवर दाखविणे हा या कार्यक्रमात सहभागी होण्याचा उद्देश होता. डब्ल्यूटीएम लंडन २०१७ येथील महाराष्ट्र पॅव्हेलिअनचे उद्घाटन महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते झाले. या वेळी भारताच्या पर्यटन सचिव श्रीमती रश्मी वर्माएमटीडीसीचे व्यवस्थापकीय सहसंचालक आशुतोष राठोड उपस्थित होते.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) या वर्षी अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन वन्य पर्यटनवारसा पर्यटनकिल्ले पर्यटनहेलि पर्यटनवैद्यकीय पर्यटनशहर सहलीवाईन पर्यटनखाण पर्य़टनक्रुझ पर्यटन आणि वेलनेस पर्यटनाचा प्रसार केला. महाराष्ट्र हे आराम करण्यासाठी आणि व्यावसायिक दृष्टीने पर्यटन उद्योगासाठी रोमांचक आणि उत्पादनक्षम राज्य म्हणून उदयास येत आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाने आयसीई आणि इतर हॉस्पिटॅलिटी महाविद्यालयांशी हातमिळवणी करण्यावर भर दिला आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कौशल्ये विकसित केली जातात आणि त्यांना महाराष्ट्रातील विविध ठिकाणी असलेल्या एमटीडीसी रिसॉर्ट्समध्ये इंटर्नशिप करण्याची उपलब्ध करून देण्यात येते.
पर्यटन उद्योगासाठी डब्ल्यूटीएम लंडन हा एक अग्रणी आंतरराष्ट्रीय कार्यक्रम असतो. पर्यटन क्षेत्र विकसित करण्यासाठी काम करणारे विविध घटक सहभागी या कार्यक्रमात होतात. या तीन दिवसांत विविध पर्यटन विभाग एका छताखाली एकत्र येतात आणि आपापली पर्यटन स्थळेकौशल्ये आणि खासगी उद्योगांचे प्रदर्शन मांडतात आणि जगभरात पर्यटनाच्या संधी विस्तारीत करण्यासाठी ५१,००० पर्यटन तज्ज्ञआयात उद्योगातील खरेदीदारडिजिटल प्रभाव पाडणारे घटक आणि पर्यटन मंत्री यांच्याशी जोडले जाण्याची संधी मिळते.
या वेळी प्रतिक्रिया देताना पर्यटन मंत्री श्री. रावल म्हणाले, "एकाच छताखील सर्व जग पाहणेया उद्योगक्षेत्रातील अग्रणी उद्योजकांकडून आणि पर्यटन क्षेत्रात त्यांनी राबविलेल्या संकल्पना पाहून प्रेरणा घेणे हे अत्यंत प्रोत्साहित करणारे आहे. आपला उद्योग वाढविण्यासाठी आणि या क्षेत्राशी संबंधित जगातील सर्व संबंधित घटकांना एका छताखाली भेटता येण्यासाठी हे एक उत्तम व्यासपीठ आहे. महाराष्ट्र हे अत्यंत समृद्ध पर्यटन स्थळ आहे जे जगभरातील पर्यटकांच्या गरजा भागवते. महाराष्ट्रातील पर्यटन भांडार,चैतन्यमय संस्कृतीवैशिष्ट्यपूर्ण पर्यटन स्थळे आणि गुंतवणुकीच्या संधी यांचे आक्रमक मार्केटिंग करण्यासाठी डब्ल्यूटीएम लंडन २०१७ मध्ये सहभागी होणे ही सुवर्णसंधी होती."
एमटीडीसीबद्दल:
पर्यटन हे राज्यातील वेगाने प्रगती करणारे क्षेत्र आहे. या क्षेत्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मिळते आणि या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. राज्यातील पर्यटन क्षेत्राचा विकास करणे या उद्दिष्टाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) स्थापन करण्यात आले. स्थापनेपासूनच पर्यटन स्थळांचा विकास आणि देखभाल यात एमटीडीसी आघाडीवर राहिले आहे. त्याचप्रमाणे राज्यातील विविध ठिकाणी या महामंडळातर्फे रिसॉर्ट चालविण्यात येतात. पर्यटकांना सहकार्य करण्यासाठी एमटीडीसीने राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी माहिती केंद्रे सुरू केली आहेत. या माहिती केंद्रांमध्ये महाराष्ट्रातील पर्यटन स्थळेतेथे जाण्यासाठी उपयुक्त ठरणारे नकाशेमहाराष्ट्र पर्यटन मार्गदर्शक पुस्तिका आणि पर्यटन पुस्तके वाजवी किमतीत उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
महाराष्ट्र हे भारतातील पर्यटनाचे सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे. येथे स्वच्छ सागरकिनारेअभयारण्येथंड हवेची ठिकाणेनैसर्गिक गुंफाधबधबेभव्य किल्लेविविधरंगी महोत्सवप्राचीन तीर्थस्थळेवस्तुसंग्रहालये आणि ऐतिहासिक स्थळे आहेत. अधिक माहितीसाठी खालील ठिकाणी भेट द्या:  http://www.maharashtratourism.gov.in/
००००

No comments:

Post a Comment