Tuesday, 7 November 2017

फेटरी येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थी दिन

नागपूरदि.07 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिवस विद्यार्थी दिन म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फेटरी येथे आज साजरा करण्यात आला.
येथील केंद्र प्रमुख श्रीमती अलका पालवे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दलितकुमार निमजे, सहाय्यक शिक्षिका श्रीमती रहिसा कुरेशी, सुलभा खोडके, भारती राऊत, वंदना दंडारे, हेमलता धुडस व शशिकला कुंभारे उपस्थित होत्या.
शाळा प्रवेशदिनानिमित्त धनश्रेष्ठ की विद्याश्रेष्ठ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा, विद्यार्थी कसा असावा या विषयावर निबंध स्पर्धा व माझी स्वच्छ शाळा या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इयत्ता  पाचवी मधील सुर्यकांत जीवन कांबळे व सातवीतील पल्लवी संतोष ठाकरे या विद्यार्थ्यांनी धनश्रेष्ठ की विद्याश्रेष्ठ या विषयावर वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 7 नोव्हेंबर 1900 रोजी प्रतापसिंह हायस्कूल जि.सातार या शाळेत प्रवेश झाला. हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन म्हणजे एका अर्थाने शैक्षणिक क्रांतीचे पाऊल ठरले. शिक्षण हेच उन्नतीचे एकमेव साधन आहे आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या कठोर परिश्रमाची जाण सर्व विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने आज हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात आला. 
यावेळी विद्यार्थ्यांनी निबंध व चित्रकला स्पर्धेंमध्ये मोठया प्रमाणात सहभाग नोंदवला होता.

No comments:

Post a Comment