Thursday, 9 November 2017

बेल्जियमचे महाराजा फिलिप्पे व महाराणी मथिलदे यांचे मुंबईत आगमन

मुंबईदि. 9 : बेल्जियमचे महाराजा  फिलिप्पे  व महाराणी मथिलदे  यांचे शिष्टमंडळासह येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विशेष विमानाने आज आगमन झाले.
            शिक्षण मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत पुस्तक देऊन बेल्जियमचे महाराजा व महाराणी यांचे स्वागत केले.
         यावेळी स्वागतासाठी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, मुख्य सचिव सुमित मल्लिकमुख्य राजशिष्टाचार अधिकारी श्याम गोयल यांनी बेल्जियमचे महाराजा फिलिप्पे व राणी मथिलदे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी  उपस्थित होते.
००००

No comments:

Post a Comment