Thursday, 9 November 2017

शेतमालाचे आयात शुल्क वाढविण्यासाठी केंद्र शासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश - कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत

मुंबईदि. 9 : विविध शेतमालाचे आयात शुल्क वाढविण्यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे आयात शुल्क वाढण्यास यश प्राप्त झाले असून त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्यास मदत होईलअसे राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
            केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार सोयाबीन तेलावरील आयात शुल्क साडेबारा टक्क्यावरुन टक्के वरून साडेसतरा टक्केरिफाईंड ऑइल 15 टक्क्यावरून 25टक्के तसेच क्रूड पाम तेलावरील आयात शुल्क 7 टक्क्यावरून 15 टक्के करण्यात आले आहे. पिवळ्या मटारवर यापूर्वी आयातशुल्क नव्हते ते आता 50 टक्क्यापर्यंत वाढविले आहे. गहू आयातीवरील आयात शुल्क 10 टक्क्यावरुन दुप्पट करुन 20 टक्क्यापर्यंत नेले आहे. केंद्र शासनाने तूरमुग व उडीद यावर असणारी निर्यात बंदी उठवली आहे. तूर आयातीवर केंद्र शासनाने दोन लाख टनापर्यंत निर्बंध लावला असून उडीद व मूग आयातीवर तीन लाख 50 हजार टनापर्यंत निर्बंध लादला आहे. तूरमुगउडीद,कापूसभातज्वारीबाजरी मका व सोयाबीन आदींच्या किमान आधारभूत किंमतींमध्ये  चालू वर्षी भरीव केली असल्याने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
            राज्यात कृषी मुल्य आयोगाची स्थापना केल्यामुळे शेतमालाच्या दरासंदर्भात केंद्राशी समन्वय साधण्यासाठी त्याचा उपयोग झाला आहेअसेही श्री. खोत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 
००००

No comments:

Post a Comment